नंदुरबार l प्रतिनिधी
जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ओळखली जाते विद्यार्थी परिषद शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेल्या ७३ वर्षापासून कार्यरत आहे. विद्यार्थी परिषदेचे संपूर्ण वर्षभरातील आगामी दिशा तसेच शैक्षणिक व सामाजिक प्रस्ताव पारित करण्यात येतात या अधिवेशनात सबंध महाराष्ट्रातून विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन बाल हुतात्मा शिरीष कुमार नगरी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर नंदुरबार येथे दि.११,१२ व १३ फेब्रुवारी २०२२ या काळात होणार आहे.
५६ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचे पोस्टर अनावरण अधिवेशन स्वागत समितीच्या अध्यक्षा सौ. ईला राजेंद्र गावित, उपाध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर, प्रा. हिम्मतराव चव्हाण, सचिव संतोष पाटील, व्यवस्था प्रमुख प्रा.डॉ. गिरीश पवार, प्राचार्य सौ. सुहासिनी नटावदकर, जिल्हाप्रमुख प्रा.डॉ. दिनेश खरात, जळगाव विभाग संयोजक निलेश हिरे, नंदुरबार शहराध्यक्ष प्रा.भूषण देशपांडे, शहर मंत्री जयेश चौधरी यांच्या हस्ते नंदुरबार येथे करण्यात आले.








