Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विवाहितेस जाळून मारुन टाकल्याप्रकरणी पतीस न्यायालयाने सुनावला 10 वर्षांचा कारावास

team by team
February 2, 2022
in क्राईम
0
विवाहितेस जाळून मारुन टाकल्याप्रकरणी पतीस न्यायालयाने सुनावला 10 वर्षांचा कारावास

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वडाळी येथील विवाहितेस जाळून मारुन टाकल्याप्रकरणी 10 वर्षांचा कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा पतीस शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की,शहादा तालुक्यातील वडाळी येथील अनिल सदगीर गोसावी यांचे लग्न वेळोदा ता.चोपडा जि. जळगाव येथील अनिता विश्वास गोसावी हिच्याशी सन 2006-07 साली लग्न झाले होते. लग्नानंतर अनिता ही सासरी वडाळी येथे आरोपी सोबत प्रपंच करण्यास आली असता अनिल सदगीर गोसावी यांच्याकडून वेळोवेळी अनिताचा त्रास देवून छळ केला जात होता. परंतू अनिता सर्व त्रास सहन करून अनिल सदगीर गोसावी यांच्यासोबत संसार करीत होती. दरम्यानचा काळात उभयंतांना सागर व जानव्ही असे अपत्य आहेत.
दि.26 मे 2016 रोजी अनिताने बचत गटातून 20 हजार रुपये कर्ज काढून आणले नाही या कारणावरून वाद उपस्थित करून अनिल गोसावी याने पत्नी अनिताच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून टाकले. अनिता गंभीररित्या जळालेली असल्याने धुळे येथे उपचार सुरु होते. अनिताचे मृत्युपुर्व जबाब नोंदविण्यात आल्यानंतर मृत्युपुर्व जबाबाच्या अनुषंगाने अनिल सदगीर गोसावी याच्याविरूद्ध सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरक्षक कृष्णा दाभाडे यांनी केला. धुळे येथे उपचार घेत असतांना दि. 31 मे 2016 रोजी अनिता मयत झाली.
याबाबत अनिल गोसावी याच्याविरुद्ध शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने भा.दं.वि. कलम 302 अन्वये दोष निश्चिती केली. न्यायालयात अभियोग पक्षातर्फे सदर गुन्हयातील 15 साक्षीदार तपासण्यात आले. सदर गुन्हयाचे संबंधात आवश्यक कागदोपत्री पुरावा व साक्षीदारांचा आलेला पुरावा लक्षात घेवून न्या. व्ही.एम. पथाडे यांनी आरोपी अनिल सदगीर गोसावी यास भा.दं.वि कलम 304/1 अन्वये दोषी धरून 10 वर्षाचे सक्तमजूरीचा कारावास व 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.यशवंतराव मोरे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून अविनाश बिरारे यांनी कामकाज पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार सायबर सेलची धडाकेबाज कामगीरी , मागीलवर्षी १९ लाख परत मिळवून देण्यात यश,ऑनलाईन फसवणुक झाल्यास हे करा

Next Post

आमदार राजेश पाडवी उनपदेव येथे पाहणी करीत जाणून घेतल्या समस्या

Next Post
आमदार राजेश पाडवी उनपदेव येथे पाहणी करीत जाणून घेतल्या समस्या

आमदार राजेश पाडवी उनपदेव येथे पाहणी करीत जाणून घेतल्या समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add