म्हसावद l प्रतिनिधी
बायफसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एएस्के फाऊंडेशन मार्फत राणीपूर येथे समृद्ध किसान कार्यक्रम अंतर्गत भुईमुग या पिकावर शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, यासाठी कृषी महाविद्यालय लोणखेडा येथील प्रा. हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञान अंतर पिकावरील रोग, कीड खत, पाणी व्यवस्थापन, काढणी उत्पादन व या पिकासाठी बाजारात मागणी असल्याने शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे संस्था अंतर्गत १०० शेतकऱ्यांना २० किलो बियाणे खत दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी ड्रम व फवारणी पंप ई साहित्य देण्यात आले. बायफ संस्थेचे विभागीय प्रमुख लिलेश नाटेश्वर चव्हाण, देवेंद्र पाटील उपस्थित होते.गावाचे सरपंच संतोष भाईदास पावरा,पंचायत समिती सदस्य विजयसिंग पावरा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश पाटील, संजय पावरा ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.