Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसा निमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर करा: बिरसा फायटर्सतर्फे मागणीचे निवेदन

team by team
July 21, 2021
in राज्य
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
9 ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येतो त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी धुळे  बिरसा फायटर्स युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व आदिवासी विकास मंत्री अँड के.सी.पाडवी,  जिल्हाधिकारी धुळे, तहसीलदार शिरपुर यांच्या कडे निवेदन द्वारे मागणी केली आहे.
       या निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींच्या सन्मानार्थ 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समुदायाच्या अधिकारांच्या रक्षणार्थ, सन 1993 हे वर्ष जागतिक आदिवासी वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय देखील घेतला.
    देशभरात व महाराष्ट्रात 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. राजस्थान सरकारने 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच अनेक राज्यात 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आदिवासी दिनानिमित्त राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात आदिवासी सांस्कृतिक देखावे, रॅली, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर काही जिल्ह्यात आदिवासींचे हक्क व अधिकारासाठी आंदोलन  व मोर्चा काढले  जातात.
    आदिवासी समाजाची अस्मिता, अस्तित्व, स्वाभिमान, संस्कृतीची ओळख, हक्क व अधिकाराची ओळख होऊन कर्तव्याची जाणीव होण्यासाठी, सामाजिक ऐक्य, सलोखा, विविधतेत एकता टिकून राहावी तसेच आदिवासींचे जल, जंगल, जमीन यातील अस्तित्व, सार्वभौमत्व टिकून राहावे, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी तसेच आमचे अनेक आदिवासी बांधव सरकारी कर्मचारी व अधिकारी आहेत म्हणजेच विविध खात्यात सरकारी नोकरी करतात. या दिवशी सुट्टी नसल्यामुळे, सरकारी कर्मचारी यांना या दिवशी नाईलाजाने रजा टाकावी लागते. काही आदिवासी बांधवांना सुट्टी नसल्यामुळे  या दिवसाचा आनंद घेता येत नाही. म्हणून आदिवासी बांधवांना 9 ऑगस्ट रोजी सार्वजनिक शासकीय सुट्टी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. 10 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाची ही रास्त मागणी लक्षात घेऊन शासकीय परिपत्रक काढून ९ ऑगस्ट हा दिवस दर वर्षी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात यावी अशी मागणी जितेंद्र पावरा धुळे युवा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स संघटना व बिरसा फायटर्स संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे email द्वारे मागवी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तिसी येथील रेल्वेगेट २७ जुलैपर्यंत बंद

Next Post

रासायनिक खता ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा : जि. प.अध्यक्ष ॲड. सिमा वळवी

Next Post
रासायनिक खता ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा : जि. प.अध्यक्ष ॲड. सिमा  वळवी

रासायनिक खता ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा : जि. प.अध्यक्ष ॲड. सिमा वळवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add