Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देशासाठी गांधीजींनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील- पं. स. सदस्या रोहिणी पवार

team by team
January 31, 2022
in सामाजिक
0
देशासाठी गांधीजींनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील- पं. स. सदस्या रोहिणी पवार

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणे येथील स्व. निलेश राजपूत बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचालित सरस्वती क्लासेस येथे हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांचा स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून मंदाणे येथील सेवानिवृत्त सैनिक यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी निमित्ताने पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा पं. स. सदस्या रोहिणीताई पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सैनिक महेश्वर पाटील व मुकेश पवार उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य लढा अहिंसेच्या मार्गाने उभा करून ब्रिटिश राजवटी विरुद्ध महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याची चळवळ यशस्वी केली. देशासाठी गांधीजींनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांचे कार्य आणि विचार सतत मार्गदर्शक राहतील अशा शब्दात पं. स. सदस्या रोहिणीताई पवार यांनी आदरांजली वाहिली. त्याचसोबत सेवानिवृत्त सैनिक महेश्वर पाटील व प्रा. दिनेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारताला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक होते. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८ रोजी. महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. गांधी स्मृतीमध्ये नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी प्रार्थनेला जातांना गांधीजींवर गोळ्या झाडल्या त्या दिवशी महात्मा गांधी यांचे निधन झाले बापूंची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात येते.
यावेळी मंदाणे गणातील पं. स. सदस्या रोहिणीताई पवार, सेवानिवृत्त सैनिक महेश्वर मनोहर पाटील, सेवानिवृत्त सैनिक मुकेश जयवंतराव पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रा. दिनेश पवार, संस्थेचे अध्यक्ष के. एस. राजपूत, संस्थेचे सचिव पी. आय. माळी, शिक्षिका अनिता मोरे, स्वाती सूर्यवंशी, अश्विनी बोरसे, वैशाली पाटील, दीपाली पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती सूर्यवंशी यांनी तर आभार के. एस. राजपूत यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नेमसुशिल विद्यामंदिरात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Next Post

बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचा कट्टा बाळगणारे दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक

Next Post
बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचा कट्टा बाळगणारे दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक

बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचा कट्टा बाळगणारे दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add