म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अभिजित मोरे व नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा अभियाना अंतर्गत अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, शहादा तालुका अध्यक्ष माधव पाटील , जिल्हा समन्वयक शांतीलाल साळी, युवक जिल्हा अध्यक्ष सीताराम पावरा, महिला जिल्हा सरचिटणीस अलका जोंधळे , महिला जिल्हा उपाध्यक्ष शिला मराठे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र वाघ, जिल्हा कार्यकारणी सदस्य विष्णू जोंधळे,जिल्हा महिला समन्वयक सीमा सोनगिरे, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक दानिश पठाण, युवक तालुकाध्यक्ष महेंद्र कुवर, शुभाष शेमले, शहादा शहर उपाध्यक्ष रविंद्र तिरमले, शहर सचिव, हृध्येश चव्हाण , आदिवासी विभाग तालुका अध्यक्ष संतोष पराडके, युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटू कुवर , जिल्हा संघटक मिनाज मोनशी,समता परीषद जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे, महिला तालुका उपाध्यक्ष आक्काताई ठाकरे, शहर कार्याध्यक्ष शुभम कुवर,धनराज जयस्वाल ,विनोद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.