नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात काल दि.28 जानेवारी रोजी 277 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.तर कोरोनामुळे 72 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.त्याच सोबत कोरोना मुक्तीचे प्रमाण ही जास्त आहे.दि.28 जानेवारी रोजी 277 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.तर नंदूरबार शहरातील 72 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झाला आहे. सदर महिलेला 25 जानेवारी रोजी रुग्णालयात दखल करण्यात आले होते तिचा 28 जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.तिसऱ्या लाटेमधील हा तिसरा कोरोनामुळे मृत्यू आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 954 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.सध्या नंदूरबार जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94 टक्के तर पॉझिटिव्ह रेट 30 टक्के आहे.जिल्ह्यात सध्याच्या घडीला 1 हजार 622 ॲक्टिव रुग्ण आहेत.