म्हसावद l प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून त्यासाठी सन 2022 हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत असल्याने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी शहादा येथे सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे जनतेमध्ये देशप्रेम जागृत व्हावे व ते वृद्धिंगत व्हावे यासाठी भारत माता प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमात भारत माता प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुरुचरण राजपाल, माजी उपनगराध्यक्ष दीपक पटेल, प्रा लियाकतअली सैय्यद,नुहभाई नूरानी, सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी, सुनील सोमवंशी, अनिल सोळंकी, मुख्याध्यापक पी. जी. पाटील, प्रभाकर उमराव, आर टी पटेल, पुरुषोत्तम शिंपी, उदय निकुम,प्रा नेत्रदीपक कुवर, समीर जैन, पिनाकिन पटेल, भिक्कन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांनी आणि शहरातील ,परिसरातील अनेक नागरिकांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण केले.