नंदूरबार l प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र अंनिस व जायंट्स ग्रुप शहादा, जयंट्स शहादा सहेली ग्रुप यांच्या संयुक्तपणे आयोजित भव्य रक्तदान शिबिरास 81 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मोतीलाल फकीरा पाटील ,महाराष्ट्र अंनिस चे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी आणि शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. डी.पटेल, प्रांताधिकारी चेतनसिंग गिरासे, नगरपालिका मुख्याधिकारी दिनेश सिनारे, ज्येष्ठ नागरिक संघाचे ॲड. गोविंद पाटील, जयंट्स चे अध्यक्ष भूषण बाविस्कर, जयंट्स सहेली अध्यक्षा दिपाली बाविस्कर, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष आर टी .पाटील ,लियाकत अली सैय्यद,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे, विचारधारा फाऊंडेशनचे तात्याची पवार, महात्मा फुले समता परिषदेचे राजेंद्र राष्ट्र सेवा दलाचे राज्य मंडळ सदस्य कैलास भावसार,अंनिस उपाध्यक्ष संगीता पाटील, मानक चौधरी, माधव पाटील, रवींद्र जमादार, नरेंद्र पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संविधानाची प्रास्ताविका चे सामूहिक वाचन करून करण्यात आले. विष्णू जोंधळे यांनी यासाठी सहभाग नोंदवला.
सूत्रसंचालन प्रवीण महिरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन भूषण बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंनिस कार्याध्यक्ष संतोष महाजन, प्रधान सचिव श्रीकांत बाविस्कर ,जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदीप केदारे, प्रवीण सावळे,विजय बोढरे, भटू वाकडे ,नवलसिंग राजपूत श्याम भलकारे, भारती पवार,के आर पाडवी, जायंट्स ग्रुपचे के.के .सोनार ,दिलीप पाटील ,डॉ.विवेक पाटील,डॉ. लक्ष्मण सोनार, नरेंद्र पाटील, गणेश पाटील, नीलेश सोनार, अजबसिंग गिरासे, डॉ. लकेश पाटील, डॉ.स्मिता जैन ,अर्चना सोनार, मंगल मराठे,बतुल बोहरी,नलिनी पवार यांनी परिश्रम केले. शहादा ब्लड बँकेचे कर्मचारी डॉ. नाजीम तेली, अब्दुल कादिर व त्यांच्या सर्व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले. याप्रसंगी जायंट्स ग्रुप,जयंट्स सहेली, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवादल, ज्येष्ठ नागरिक संघ ,विचारधारा फाउंडेशन याआदी संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.