Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिला आयोग राज्यातील 25 हजार गायब मुलींना कधी शोधणार : हिंदु जनजागृती समिती

team by team
January 28, 2022
in क्राईम
0
महिला आयोग राज्यातील 25 हजार गायब मुलींना कधी शोधणार :  हिंदु जनजागृती समिती

नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय कायद्यानुसार वयात आलेल्या युवक-युवतीने स्वसंमतीने विवाह करणे, हे कायदेशीर आहे; मात्र त्याचा राजकीय दृष्टीने लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे, हे पूर्णपणे अयोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रचलित कथेनुसार कल्याणच्या सुभेदाराच्या मुसलमान सुनेचा आदर केला, तिचे धर्मांतर केले नाही; परंतु त्याच वेळी त्यांनी बजाजी निंबाळकर आदी जबरदस्तीने मुसलमान बनवलेल्या हिंदूंना त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात परत घेतले आणि त्यांच्याशी सोयरीक जोडली. आज ‘लव्ह जिहाद’चे भयंकर षड्यंत्र चालू असतांना त्यात अडकलेल्या हिंदू युवतींना पुढे जबरदस्ती इस्लाम कबूल करण्यासाठी अत्याचार करण्यात येतात. तसेच अनेकींची हत्याही केल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. उद्या या कुटुंबाला मुले झाल्यास ती ‘हिंदू’ असतील कि ‘मुसलमान’ ?अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता केवळ प्रसिद्धीसाठी ‘लव जिहाद’ला ‘शिवविवाह’ म्हणणे, हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.
पूर्वी समाजवादी चळवळीतले नेतेही त्यांच्या कार्यकर्त्या असणार्‍या हिंदू मुलींचा विवाह मुसलमान युवकांसोबत लावून प्रसिद्धी मिळवत असत; मात्र स्वतःच्या मुलींसाठी कोकणस्थ, देशस्थ असे भेद पाहून मुलगा शोधत असत. या समानतेच्या चळवळीत छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवणार्‍यांनी स्वतःच्या मुलींसाठी असा विवाह ठरवल्यास खरे तर ‘स्वतः केले आणि मग सांगितले’, असा आदर्श घालून देता येईल. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर या अशा विवाहाचे समर्थन करत आहेत, हे दुर्दैवी आहे. एखाद्या आयेशा, रुकसाना हिचा विवाह एखाद्या हिंदू मुलाशी लावून त्या समारंभात चाकणकर यांनी जाऊन उभयतांना आशीर्वाद द्यावेत, मग त्यांची धर्मनिरपेक्षता खरी असल्याचे म्हणता येईल. खरे तर महाराष्ट्रात आज 25 हजार मुली आणि महिला गायब असण्याची धक्कादायक स्थिती असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा अशा कार्यक्रमात सहभागी होत आहेत, हे दुर्दैवी आहे. तसेच शिवविवाहाच्या नावे धर्मद्रोहाची राजकीय पोळी भाजणाऱ्या ब्रिगेडी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो, असेही समितीने म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे निलंबित कंडक्टरने सुरु केले भोजनालय

Next Post

एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रादेशिक क्विज कॉम्पिटीशन स्पर्धेत घवघवीत यश

Next Post
एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे  उपप्रादेशिक क्विज कॉम्पिटीशन स्पर्धेत घवघवीत यश

एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रादेशिक क्विज कॉम्पिटीशन स्पर्धेत घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add