नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा अंतर्गत परिषद शाळा वर्गखोल्यांचे निर्लेखन करणेबाबत लेखी आदेश प्राथमिक शिक्षण विभागाकडून पारित करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद सर्व साधारण ऑनलाईन पद्धतीने झालेल्या सभेत निर्देश दि.27 जानेवारी 2022 निर्लेखन प्रस्ताव सादर करण्यात आले त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून गांभीर्यपूर्वक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळांना आदेशीत करण्यात आले की, जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे अथवा वर्गखोल्यांचे निर्लेखन करावयाचे प्रस्ताव नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयास वेळोवेळी प्राप्त झाले असून अजून काही प्रस्ताव संबंधीत शाळांचे मुख्याध्यापक यांनी सदर कार्यालयास परस्पर सादर केले असून दि.27 जानेवारी 2022 च्या झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेचे सदस्यांनी वर्गखोली निर्लेखनाच्या बाबतीत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने सदर कार्यालयास सादर करावयाच्या शाळा वर्गखोल्या निर्लेखन प्रस्तावाच्या संदर्भात निर्देश देण्यात आले असून त्यात.
शाळा वर्गखोली निर्लेखनाचे प्रस्ताव संबंधीत तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्या मार्फतच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण कार्यालयास संबंधीत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सादर करावेत,शाळा/वर्गखोली निर्लेखनाच्या बाबतीत संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव करून
संबंधीत तालुक्याचे समग्र शिक्षाचे अभियंता अथवा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावे. संबंधीत समग्र शिक्षाचे अभियंता आणि गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्याचे पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता यांचे मार्फत शाळेला भेट देऊन निर्लेखन करावयाच्या शाळा वर्गखोलीची तपासणी करुन विहित प्रपत्रात निर्लेखनाची माहिती परिपूर्ण भरून जिओ टॅगच्या फोटोसह माहिती संबंधीत तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा कार्यालयास सादर करावी. प्रस्तावासोबत बांधकामाचे वय वर्षे व इमारत वर्गखोलीचे घसारा मुल्य उपअभियंता यांचेमार्फत भरुन स्वाक्षरीत गटविकास अधिकारी यांचे मार्फत या कार्यालयास सादर करावे
निर्लेखनाच्या विहित प्रपत्रावर संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक, समग्र शिक्षा अभियंता, गटशिक्षणाधिकारी, तालुका
पंचायत समितीचे उपअभियंता आणि गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्ष-या असाव्यात. उपरोक्तप्रमाणे बाबींची पूर्तता करुनच प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयास सादर करावेत वरीलप्रमाणे प्रस्ताव प्राप्त न झाल्यास अशा प्रस्तावांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही अथवा पत्र व्यवहार या कार्यालयाकडून केला जाणार नाही याबाबत स्वयंस्पष्ट करण्यात आली आहे
तसेच सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांनी अधिनस्थ विस्तार अधिकारी शिक्षण केंद्रप्रमुख आणि समग्र शिक्षाचे अभियंता यांच्या मार्फत तालुक्यातील शाळांच्या वर्गखोल्यांची पाहणी करून निर्लेखन करावयाची आवश्यकता असल्यास उपरोक्त निर्देशाप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करावे.सदरची बाब जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्देशानुसार करावयाची असल्याने याबाबत प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण अधिकारी डॉ युनूस पठाण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी निर्देशित केल्यानुसार आदेश पारित केले आहेत.