Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दलीतवस्ती सुधार योजनेंतर्गत नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये नियम डावलून निधी वाटप : जि. प.सर्वसाधारण सभेत जि.प.सदस्यांचा आरोप

team by team
January 28, 2022
in राजकीय
0
दलीतवस्ती सुधार योजनेंतर्गत नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये नियम डावलून निधी वाटप : जि. प.सर्वसाधारण सभेत जि.प.सदस्यांचा आरोप

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कोरोना प्रादूर्भावामुळे शासकीय निर्देशानुसार काल ऑनलाईन घेण्यात आली. सदरच्या सभेत सौर कृषीपंप, रोजगार हमी योजना, दलीतवस्ती सुधार योजना, जलजीवन मिशन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.दरम्यान दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये नियम डावलून निधी वाटप झाल्याचा आरोप जि.प.सदस्यांकडून करण्यात आला.
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जि.प.ची सर्वसाधारण सभा काल ऑनलाईन घेण्यात आली. या सभेला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्यासह विविध विषय समिती सभापती, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.सदस्य, विविध विभाग प्रमुख ऑनलाईन उपस्थित होते. सभेदरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून कृषी विभागांतर्गत लेखाशीर्ष २४०१-१०१-५२ अंतर्गत अपारंपारीक ऊर्जास्त्रोत निर्माण करणे व सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यांतर्गत १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद पुर्ननियोजनाद्वारे किंवा वाढीव निधी उपलब्ध होवून योजनेस मंजूरी देण्याबाबत असा विषय अजेंड्यावर होता. यावेळी जि.प.सदस्या सुप्रिया गावित यांनी १०० टक्के अनुदानावर सौर पंप वाटपाऐवजी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारची कुसूम योजनेतून सौर पंप वाटपाचे नियोजन केल्यास लाभार्थी संख्या वाढण्यास मदत होईल. यामुळे सौर पंप वाटप करतांना कुसूम योजनेतून वाटप करण्यात यावे, अशी मागणी केली. दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र अंतर्गत समृद्धी लेबर बजेट सन २०२२-२३ कृती आराखड्यास मंजूरी मिळण्यासाठी चर्चा होत असतांना धडगाव तालुक्यातील काही गावांमधील बेरोजगारांनी रोजगार मिळावा यासाठी गेल्या तीन वर्षापासून अर्ज तसेच जॉब कार्ड जमा केलेले असतांनाही अद्याप त्यांना काम मिळाले नसल्याचे सुप्रिया गावित यांनी सांगितले. तसेच लोभाणी ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या गव्हाणीपाडा येथील ४१ बेरोजगार नागरिकांनी सन २०१८ ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत कामाची मागणी करण्यात आली होती. सदर बेरोजगारांना देय असलेला ३ लाख ४३ हजार १२८ रुपयांचा भत्ता अद्यापही मिळाला नसल्याने ते वंचित असल्याचे सुप्रिया गावित यांनी सांगितले. दरम्यान, दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये नियम डावलून निधी वाटप झाल्याचा आरोप जि.प.सदस्यांकडून करण्यात आला. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत देखभाल दुरुस्तीसाठी ५ टक्के लोकवर्गणीतून निधी खर्च करण्यात येतो. मात्र सदरची लोकवर्गणी न झाल्यास योजना बंद पडण्याची शक्यता आहे. यामुळे आकांक्षित जिल्हा म्हणून प्राप्त झालेल्या निधीतून सदरची रक्कम जलजीवन मिशनसाठी वर्ग करण्यात यावी, अशी मागणी जि.प.सदस्या हेमलता शितोळे यांनी केली. तसेच जि.प. प्रशासकीय इमारतीत महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष असावे, अशी मागणी श्रीमती शितोळे यांनी केली. दरम्यान, ठाणेपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याने रुग्णांचे हाल होवू नये यासाठी काही दिवस पर्यायी डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी जि.प.सदस्य देवमन पवार यांनी केली.जि.प.ची सभा ऑनलाईन झाल्याने नेटवर्कअभावी अनेकांना अडचणी येत होत्या. त्यातच एकाच वेळेला एकापेक्षा जास्त जण बोलत असल्याने विषय समजू शकले नाहीत.

बातमी शेअर करा
Previous Post

शनिमांडळ येथील उपविद्युत सबस्टेशनची विज इतर कुठल्याही गावांना दिल्यास आंदोलन छेडण्याचा गावकऱ्यांचा इशारा

Next Post

फोरव्हीलर व मोटारसायकलची समोरासमोर झालेल्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार तर ६ जण जखमी, चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post
शहादा लोणखेडा बायपासवर बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार तर ६ जण जखमी

फोरव्हीलर व मोटारसायकलची समोरासमोर झालेल्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार तर ६ जण जखमी, चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add