नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा येथील श्री. दत्त गणेश मंडळ येथील युवकांनी आपल्या मंडळाचा अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा व प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून भारत माता पूजन व रांगोळी स्पर्धा नृत्य स्पर्धा आयोजित केली. यात रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची वाणी द्वितीय क्रमांक अश्विनी सोनार तर तृतीय क्रमांक फालगुनी होळकर व प्रीती तांबोळी विजयी झाले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून यासाठी जिल्हाभरात विविध सांस्कृतिक व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या स्वातंत्रदिन म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत त्यासाठी सण 2022 हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे होत आहे या अमृत महोत्सवानिमित्त 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जनतेमध्ये देशप्रेम जागृत व्हावे देश प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होत आहे या अनुषंगाने तळोदा येथील श्री दत्त गणेश मंडळ येथील युवकांनी आपल्या मंडळाचा अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा व प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून भारत माता पूजन व रांगोळी स्पर्धा नृत्य स्पर्धा आयोजित केली. यात रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची वाणी द्वितीय क्रमांक अश्विनी सोनार तर तृतीय क्रमांक फालगुनी होळकर व प्रीती तांबोळी यांचा आला तसेच सहभागी सर्वांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली नृत्य स्पर्धा चे नियोजन २ दिवसात झाल्याने वेळेवर १ पर्सनल व १ ग्रुप डान्स झाल्याने यात सहभागी योगिनी परदेशी, चाणाक्षी बारी, प्राची तांबोळी व वैष्णवी सोनार यांना बक्षिसे देण्यात आलीत. या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य मंडळाचे अध्यक्ष तसेच विविध कार्यकारणी तसेच पंकज तांबोळी, शरद होळकर, केतन तांबोळी, भुपेंद्र बारी, संजय तांबोळी, हर्षवर्धन होळकर, सुनिल परदेशी, अनमोल वाणी, कांतीलाल पाटील, नितेश सोनार, भुषण होळकर, रविंद्र मराठे, मनोज बारी, अमोल तांबोळी, निखिल तांबोळी, हर्षित बारी, विजय तांबोळी, दिपेश परदेशी, मोहित तांबोळी, विवेक परदेशी, सिध्दार्थ तांबोळी या युवकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.