Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे हर्बल टेक्नॉलॉजी विभागाच्या अभ्यास मंडळावर निवड

team by team
January 27, 2022
in शैक्षणिक
0
शहादाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे हर्बल  टेक्नॉलॉजी विभागाच्या अभ्यास मंडळावर निवड

शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे हर्बल टेक्नॉलॉजी विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली असून त्यांना या बाबतचे नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या शिफारशीनुसार डॉ. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.पवार यांचा अनुभव, संशोधन आणि कार्याची दखल घेऊन सदर विद्यापीठाने त्यांची हर्बल टेक्नॉलॉजी विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ.एस.पी.पवार हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यापीठात फार्माकोग्नसी व फायटोकेमिस्ट्री या विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे फार्मासुटीकल सायन्स या विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या औषधनिर्माणशास्त्रच्या संशोधन आणि मान्यता समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत तसेच या विभागाच्या अभ्यास मंडळाचे चेअरमन पद त्यांनी भूषविले आहे. त्यांचे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त शोध निबंध तसेच संशोधन यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झाले असून त्यांनी अनेक परिसंवाद, कार्यशाळा आणि परिषदेमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांना वीस वर्षापेक्षा जास्त औषधनिर्माणशास्त्रच्या (फार्मसी) च्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असून डॉ. पवार यांना अनेक महाविद्यालयात आमंत्रित शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी आमंत्रित केलेे जाते. आता पर्यंत एकूण 9 पी.एच.डी. (पदव्युत्तरपदवी) च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून कार्य केले असून त्यांना संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे त्यापैकी 4 विद्यार्थ्यांचे पी.एच.डी. पूर्ण झाले असून 5 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच पदव्युत्तर (एम.फार्मसी) च्या अनेक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी (रिसर्च प्रोजेक्ट) मार्गदर्शन केले आहे व 9 पेक्षा जास्त पुस्तकांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशन झाले आहे. त्यांचा ह्या संपूर्ण कार्यशैली व अनुभवामुळे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे हर्बल टेक्नॉलॉजी विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल फार्मसी कॉउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ पी.जी.येवले, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांनी डॉ पवार यांचे अभिनंदन केले. मंडळातील विविध महाविद्यालयातील सर्व प्राचार्य व प्राध्यापक वृंद यांनी प्राचार्य डॉ.पवार यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.अनिल अवचट- एक आठवण

Next Post

तळोदा येथील श्री. दत्त गणेश मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त रांगोळी व नृत्य स्पर्धा उत्साहात

Next Post
तळोदा येथील श्री. दत्त गणेश मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त रांगोळी व नृत्य स्पर्धा उत्साहात

तळोदा येथील श्री. दत्त गणेश मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त रांगोळी व नृत्य स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add