नवापूर l प्रतिनिधी
नवापूर नगर पालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या 69 कुटूंबियांना पर्यायी जागा मिळणे यासह भुयारी मार्गाबाबत अनेकदा निवेदन देऊनही समस्या न सुटल्याने भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनी शहरातील जनहिताच्या कामासाठी नवापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नवापूर नगर पालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या 69 कुटूंबियांना पर्यायी जागा मिळणे व उपजिल्हा रुग्णालय समोर डिपी रोड ला जोडून राष्ट्रीय महामार्गावर भुयारी मार्ग करणे तसेच इस्लामपुरा व दिगंबर पाडवी सोसायटीला जोडण्यासाठी भुयारी मार्ग (बोगदे) करण्या बाबत संदर्भात एजन्सीला वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासन कुंभकर्णी निंद्रेतुन उठायला तयार नाही.म्हणून या समस्येचा निराकरण व्हावे म्हणून नगर पालिका प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना जागे करण्यासाठी तहसिल कार्यालयासमोर आज भारतीय जनता पाटीने आंदोलन केले. आंदोलनात भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,एजाज शेख,नगरसेवक महेंद्र दुसाणे,जयंतीलाल अग्रवाल,जितेंद्र अहिरे,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,कृणाल दुसाने, दुर्गा वसावे,नगरसेवक,गिरीष गावीत,बंटी चंदलानी,माजी नगरसेवक सुनिता वसावे,जाकीर पठाण,घनशाम परमार,कमलेश छत्रीवाला सह देवळफळी भागातील बांधीत परिवारातील कुंटुबीय मोठ्या संख्यने उपस्थित होते. तहसिल कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन होते.तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी या बाबत दखल घेऊन संबधित अधिकाऱ्यांना पाचारण करुन आंदोलनकर्त्यांशी चर्चा घडवुन आणली. महामार्ग प्राधीकरणाचे साईट इंजिनियर निखिल महाले यांनी आंदोलन कर्त्यांशी मागणी बाबत वरीष्ठ स्तरावर चर्चा करुन दि ५ फेब्रुवारी रोजी महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक टिम जागेवर पाहणी करुन याबाबत अहवाल सादर करतील.या नंतर बोगद्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.तसेच नरपालिकेचे नगराध्यक्षा हेमलता पाटील व उपाध्यक्ष अयुब बलेसरीया,नगरसेवक विश्वास बडोगे यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन मागणीबाबतीत चर्चा केली व या रस्त्यांच्या कामामुळे बाधीत होणाऱ्या ६९ कुंटुबियांना पर्यायी जागा देण्यासाठी दोन महिण्यात शासन स्तरावरुन जागा मागणी करुन प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वसन दिल्याने भाजपाचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचे वरील प्रश्ना बाबतीत समाधान झाल्यामुळे आंदोलन स्थगीत करण्यात आले या प्रसंगी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,न.पा चे प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार,न.पा अभियंता संदाशिव,महामार्ग कामाचे मक्तेदार म्हात्रे आदी अधिकारी उपस्थित होते.दि.२६ जानेवारी सारख्या दिवशी जनतेचा प्रश्नासाठी भाजपाने आंदोलन केल्यामुळे व काही प्रमाणात जनतेचे प्रश्न सुटल्यामुळे अनेकानी भरत गावीत यांचे अभिनंदन केले.