नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल ४२१ जण कोरोना मुक्त झाल्याने घरी परतले आहेत. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात ८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर काल दि.२४ जानेवारी रोजी कोरोना मुळे ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
नंदुरबार जिल्ह्यात दररोज सुमारे २५० ते ३०० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. यामुळे चिंता वाढली आहे. आज दिवसभरात तब्बल ४२१ जण बरे झाले आहेत. यामध्ये नंदुरबार शहरासह तालुक्यातील १७६, शहादा ९३, तळोदा २९, नवापूरातील ९२, अक्कलकुवा २६ तर धडगावातील ५ जण बरे झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात ८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नंदुरबारातील ४८, तळोदा २७, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रतेकी एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान काल दि.२४ जानेवारी रोजी कोरोनामुळे साक्री तालुक्यातील निजामपूर येथील ६२ वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सदर महिलेला २० जानेवारी रोजी रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.तिसऱ्या लाटेमधील हा दुसरा कोरोना मुळे मृत्यू आहे.यापूर्वी १६ जानेवारी रोजी १९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता.