म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लक्कडकोट व राणीपुर येथे आमदार राजेश पाडवी यांनी स्थानिक आमदार निधीतुन नविन डिजिटल बस स्टॉपचे भुमी पुजन केले .
या वेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की आपल्या मतदारसंघात 15 गावाना नविन बस स्टॉप माझ्या निधीतुन देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी बांधवांसाठी शेतशिवार रस्ते तयार करण्यात येत आहे.लागेल त्या ठिकाणी पुल दिले आगामी काळात मतदारसंघात 20 ते 22 रस्तांचे भुमीपुजन करून काम सुरू करण्यात येणार आहे. माझे जास्त प्राधान्य विकास कांमाना असेल असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, बाबुराव पवार,विठ्ठलराव बागले,प्रविण वळवी, दंगल सोनवणे,संरपच दारासिंग ठाकरे,संरपंच रमेश दादा,सुखलाल रावताळे,गोविद पटले,सत्तार ठाकरे,सागर नाईक,सागर रावताळे,अर्जुन पावरा,गोपाल पवार,संतोष राजपूत, गुमान पावरा,शांतीलाल रावताळे, सचिन पावरा,तुबा दादा,रमेश पावरा,गुलाब पवार सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.