म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वदूर पसरलेल्या तोरणमाळ मध्ये सध्या अधिक थंडी आहे. दि. 24 जानेवारी रोजी थंडीमुळे तोरणमाळ येथे आलेल्या पर्यटकांनी तोरणमाळ येथील हॉटेल तोरणा हिलच्या समोर पार्क केलेल्या गाड्यांवर दव बिंदूचे बर्फात रूपांतर झाल्याने गाड्यांवर बर्फाचा थर साचला होता.
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे दवबिंदू गोठल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे.वाहनांच्या टपावर गोठेलल्या दवबिंदूमुळे बर्फाची चादर पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. सर्वत्र शीतललहर पसलेली अनुभवायला येते आहे.महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित असलेल्या तोरणमाळ तापमान घसरल्याने याठिकाणी गवतावर जमा होणारे दवबिंदू तसेच वाहनांच्या टपावरील पाणी गोठेल्याचा अनुभव स्थानिकांनी घेतला.
रविवारी सकाळपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झालेल्या होता.जोरदार थंड वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जण कडाक्याच्या थंडीमुळे घरातून बाहेर पडणे देखिल टाळत आहेत.सोमवारी सकाळी तोरणमाळ येथिल स्थानिक नागरीक व हॉटेल तोरणमाळ रिसॉर्ट हिलचे मालक दिग्विजय पाडवी हॉटेलच्या बाहेर आले असता त्यांना गाडीच्या कांचावर व टपावर बर्फ जमा झालेला दिसला.गाडीच्या टपावर असलेले पाण्यामुळे टपावर बर्फाची चादर पसरलेली दिसून आली.त्यांनी आपल्या सारकर्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली.त्यांनी हाताने गाडीच्या टपावर असणारा बर्फ जमा करण्याच्या प्रयत्न केला व त्यानंतर त्यांनी तो जमा केलेला बर्फ एकमेकांवर फिरकावत गोठेलल्या दवबिंदूचा आनंद घेतला.