नंदुरबार l प्रतिनिधी
‘अमर रहे,अमर रहे’ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘अमर रहे’ अशा गगनभेदी घोषणा देत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून अभिवादन करण्यात आले.
नंदुरबार शहरातील हमालवाडा परिसरात रविवारी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रमुख डॉ. विक्रांत मोरे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांनी ‘अमर रहे,अमर रहे’ हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘अमर रहे’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी पालिकेचे उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास शिक्षण सभापती राकेश हासानी,नगरसेवक दीपक दिघे,गजेंद्र शिंपी, शरद दक्षराज धर्माळे, माजी नगरसेवक अर्जुन मराठे,मनोज चव्हाण, युवासेना जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, तालुका उपप्रमुख सागर साळुंखे, माजी शहराध्यक्ष पंडित माळी,चेतन वळवी,अतुल पाटील, मनीष बाफना, फरीद मिस्तरी,फारूक मेमन, पप्पू जाधव, बिर्जू म्हस्के, विकी कोठारे, लखन माळी, लोटन पाटील, आनंद पाटील आदी उपस्थित होते.