नंदुरबार | प्रतिनिधी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भारतीय किसान सेनेतर्फे आज त्यांना अभिवादन करण्यात आले.
नंदुरबार शहरातील सुभाष चौक येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी, जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, शहराध्यक्ष राजेश माळी,विमुक्त भटके जाती जमाती चे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव ,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला . सदर कार्यक्रम कोरोना नियमाचे पालन करून घेण्यात आला.