नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील खोंडामळी ग्रामपंचायततर्फे गावातील दिव्यांग लाभार्थीना पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले.
खोंडामळी ता.नंदूरबार ग्रामपंचायततर्फे गावातील दिव्यांग लाभार्थीना पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले.अपंगत्व 45 टक्के पुढील असणाऱ्या दिव्यांग ग्रामपंचायत नीधी शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत कार्यालयात 5 टक्के निधी हा जीवनावश्यक वस्तुस्वरुपात वाटप करण्यात आले . यावेळी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी ए. आर.निकम, महाराष्ट्र राज्य प्रदेश अपंगसेल्चे उपाध्यक्ष आनंद पाटील, ग्रा.पं.सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी गुलाब पाटील, सयाजी पाटील, पौलाद भील, चंद्रशेखर पाटील, अभयसिंग गिरासे आदी उपस्थित होते.यावेळी दिव्यांग लाभार्थी सुदाम उखा पाटील , सुकदेव राजाराम पाटील .भुषण पाटील , रूपाली जावरे ,संजय जावरे, साहेबराव भिल,ओंकार पाटील आदी ३१ लाभार्थ्यांना पाच टक्के निधी वस्तू स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते.