नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असुन कोरोना रिकव्हरी रेट घसरला असुन तो ९८ वरून ९३ टक्क्यांवर पोहचला आहे.गेल्या तीन दिवसात नंदुरबार जिल्ह्यात तब्बल १ हजार २३३ रूग्ण आढळले असुन जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या २ हजाराच्या पार गेेली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासुन सातत्याने कोरोना रूग्ण आढळत आहेत.दि.१९ जानेवारी ते २२ जानेवारीच्या रात्री आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात तीन दिवसात तब्बल १ हजार २३३ कोरोना रूग्ण आढळुन आले आहेत.यात नंदुरबार तालुक्यात ३८५, शहादा तालुक्यात ३८७ , नवापूर तालुक्यात ३५२,तळोदा तालुक्यात ४७,अक्कलकुवा तालुक्यात ४५,धडगांव तालुक्यात ७ तर जिल्हाबाहेरील १९ कोरोना रूग्ण आढळले आहेत.सध्या नंदुरबार जिल्ह्यात २ हजाराच्यावर कोरोना रूग्ण आहेत.त्यात नंदुरबार तालुक्यात ७०५, शहादा तालुक्यात ६४०, नवापूर तालुक्यात ४५२,तळोदा तालुक्यात ९०,अक्कलकुवा तालुक्यात ९४,धडगांव तालुक्यात ७ तर जिल्हाबाहेरील ३३ कोरोना रूग्ण आहेत.








