धडगाव तालुक्यातील खरवड तेलखेडी फाट्याजवळ दोन वाहनांमधून सुमारे 14 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज दिनांक 22 रोजी आडगाव पोलीस ठाण्याचे नायक योगेश निकम यांना काकडाकडून धडगावकडे दोन महिंद्रा पिकअप (क्र. एम एच 04 बी ई 8516 व एम एच12 एफ डी 0638) या वाहनातून दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार निकम यांनी किरण वळवी, गणेश भामरे यांना सोबत घेऊन खरवड तेलंखेडी फाट्याजवळ साफळा रचला. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यात 14 लाख रुपये किमतीचा अवैध दारूसाठा आढळून आला. सदर दारूसाठा जप्त करण्यात आला असून देऱ्या साईसिंग पावरा (रा. बोरी ता.धडगाव) व एक अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो नि गोकुळ औताडे करीत आहेत.