नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दि. १५ ते २१ जानेवार दरम्यान विविध ठिकाणी नाकाबंदी करून विनामास्क धारकांविरध्द कारवाई करण्यात आली. यात १ हजार ४६५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून २ लाख ९६ हजार ४०० रूपये दंड वसुल करण्यात आला. तर विविध प्रतिष्ठाने यात शासन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५६ जणांविरूध्द ५२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दि.१५ ते २१ जानेवारी २०२२ या आठवडयात नंदुबार जिल्हा पोलीस दलातर्फे कोरोनासंदर्भात प्रत्येक पोलीस स्टेशनला ठिकठिकाणी नाकाबंदी व फिक्स पॉंईट लावून तसेच पायी पेट्रोलिंग दरम्यान विनामास्क कारवाई करून दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेला नाकाबंदी करण्यात आली आहे. या कारवाईत त्यात नंदुरबार शहर वाहतुक शाखा-५४ कारवाई १० हजार ८०० रूपये दंड, नंदुरबार शहर २८८ कारवाया ५७ हजार ४०० दंड, नंदुरबार तालुका ५० कारवाया- १० हजार दंड, उपनगर-६० कारवाया १२ हजार दंड, नवापूर १७४ कारवाया ३४ हजार ८०० दंड, विसरवाडी ८७ कारवाया १७ हजार ४०० दंड, शहादा २१० कारवाया ४२ हजार दंड, सारंगखेडा- १४२ कारवाया २८ हजार ४०० दंड, म्हसावद ११७ कारवाया २३ हजार ४०० दंड, धडगाव ५८ कारवाया ११ हजार ६०० दंड, अक्कलकुवा ९५ कारवाया २२ हजार ६०० दंड, तळोदा ९५ कारवाया १९ हजार दंड, मोलगी ३५ कारवाया ७ हजार दंड असा एकूण विनामास्कच्या १ हजार ४६५ केसेस आल्या असून त्यात एकूण २ लाख ९६ हजार ४०० दंड वसुल करण्यात आला आहे. तर याच कालावधीत जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील रेस्टॅरंट व उपहारगृहे व इतर आस्थापणाची तपासणी केली असता ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त असलेले व कोविड अनुरूप वर्तन केल्याने जिल्हाभरात ५६ जणांविरूध्द ५२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाभरात सर्व पोलीस स्टेशन हद्दीत ठिकठिकाणी पोलीसांकडून नाकाबंदी तसेच पेट्रोलिंग करुन विनामास्क तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणान्या व कोविड नियमांचे पालन न करणार्या नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे . त्याचप्रमाणे आगामी काळात विवाह सोहळे तसेच सामाजिक. धार्मिक सांस्कृतिक,राजकीय कार्यक्रम,मेळावे,संमेलन या ठिकाणी देखील पोलीसांची करडी नजर असणार आहे . शासनाने दिलेल्या कोविड निर्देशांचा भंग झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून कोणतीही व्यक्ती मास्कशिवाय प्रवास करतांना आढळल्यास / योग्यरित्या मास्क न घालता आढळल्यास सदर व्यक्तीसह वाहनचालकावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे . तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सिमेवर सुद्धा नाकाबंदी करण्यात आलेली आहे . पहाटे ५ ते रात्री ११ वा . पर्यंत जमावबंदी असल्याने सदर वेळेत ५ किंवा ५ पेक्षा जास्त इसमांनी गटा- गटाने फिरण्यास मनाई असल्याने तसे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल . तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वा पर्यंत संचारबंदी असल्याने सदर वेळेत कोणीही व्यक्ती अत्यावश्यक कारणाशिवाय फिरतांना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल .जिल्ह्यात एखादी संस्था, आस्थापना ही कोविड अनुरुप वर्तन किंवा मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली किंवा एखाद्या व्यक्तीने संस्थेचा किंवा कोणत्याही आस्थापनाच्या आवारात नियमांचे उल्लंघन करतांना मिळून आल्यास पोलीस व महसूल पथकामार्फत संयुक्त कारवाई करुन सदर संस्था. आस्थापना बंद केली जाईल . वरील प्रमाणे नागरिकांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला व पासपोर्ट मिळणेकामी अडचणी येऊ शकतात . यापुढे जिल्हा पोलीस दला तर्फे अशीच कारवाई सुरु राहणार आहे . त्यासाठी नागरिकांनी कोविड १ ९ अनुषंगाने शासन निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.