म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील नवागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बैठकीत पक्ष, संघटन पक्ष वाढीसंर्दभात चर्चा करण्यात आली.
शहादा तालुक्यातील नवागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तथा राष्ट्रवादी आदिवासी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक झाली बैठकीत पक्ष, संघटन पक्ष वाढीसंर्दभात चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र कुंवर यांनी पक्षाची भूमिका मांडली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे आचार विचार व पुढील कार्या व समस्यांच्या बाबतीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष छोटु कुंवर यांनी मार्गदर्शन केले. तसेच आदिवासींच्या समस्या , प्रश्न व त्याविषयी योजनेंची माहिती ह्या संदर्भात आदिवासी सेल चे तालुकाध्यक्ष संतोष पराडके ह्यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहादा शहर कार्याध्यक्ष शुभम कुवर ,भिक्कन पावरा,विजय पावरा, विलास पावरा व राष्ट्रवादी काँग्रेस चे नवनियुक्त कार्यकर्ते आदींनी केले.