नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील एका हायस्कूलजवळून दोघा अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील एका हायस्कुलजवळून दोघा अल्पवयीन मुलींना अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरूद्ध भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आराक करीत आहेत.