नंदुरबार | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान दि. २२ जानेवारी रोजी हवामान अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी विशेषतः अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यात अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकर्यांनी जनावरांचे व कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षण करावे असे आवाहन कृषि विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान दि. २२ जानेवारी रोजी हवामान अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी विशेषतः अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यात अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा वेग काही प्रमाणात जास्त असेल.दि.२३ ते २६ जानेवारी हवामान कोरडे राहील.२३ जानेवारीपासून तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.किमान तापमान १० अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस च्या पुढे गेल्यावर करावी.पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेले तुर पिक व कापुस ताडपत्रीने झाकुण ठेवावे,पथारीवर वाळत ठेवलेल्या मिरच्या झाकून ठेवाव्यात, तापमान कमी होत असल्याने केळी व आप्पे या फळांना प्लास्टिक बॅगचे आवरण लावावे, जनावरांचे व कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षण करावे असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, कोळदातर्फे करण्यात आले आहे.