Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलिस प्रशासनाचा निषेध करीत शिवसेनेने दिले तहसीलदारांना निवेदन

team by team
January 21, 2022
in क्राईम
0
पोलिस प्रशासनाचा निषेध करीत शिवसेनेने दिले तहसीलदारांना निवेदन

अक्कलकुवा l प्रतिनिधी
खापर येथे दोन जणाच्या वाद मिटवण्यासाठी गेलेल्या लोकप्रतिनिधि वरच पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला याबाबत शिवसेनेतर्फे पोलिस प्रशासनाचा निषेध करीत तहसीलदाराना निवेदन देण्यात आले.

खापर येथील महादेव हॉटेल चालक आणि सेलम्बा येथील युवका मध्ये 18 जानेवारी रोजी रात्री किरकोळ शाब्दिक वाद झाला होता. सदर याप्रसंगी त्या ठिकाणी अचानक पोहचलेले युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ललित जाट यांनी दोन्ही पक्षांना व्यवस्थित समजावून वाद आपसात मिटवला सदर दोन्ही पक्षाचे एकमेकाविरुद्ध काही एक म्हणणे नसतांना पोलिसांनी दोन्ही पक्षावर गुन्हा दाखल केला. मात्र या विषयात मध्यस्ती करणाऱ्या युवा सेना जिल्हा प्रमुख ललित जाट यांचे काही एक घेणं देणं नसतांना उलट वाद मिटवण्यासाठी त्यानीच प्रयत्न केले असतांना त्यांच्याच विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, सदर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षातर्फे जाहिर निषेध करण्यात आला आहे . अश्याप्रकारे सामाजिक, राजकीय, जीवनात वादाच्या ठिकाणी जाऊन विषय अधिक वाढू न देता आपसात मिटवणाऱ्या लोकप्रतिनिधि वरच गुन्हे दाखल होत असतील तर यापुढे कोणीही वाद मिटवण्यासाठी सहभागी होणार नाही, युवा सेना जिल्हा प्रमुख ललित जाट हे नेहमी पोलिस प्रशासन असो किवा इतर कोणतताही प्रशासकीय विषय असो नेहमी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेत असतात. अश्या वेळी अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका जाणून न घेता हेतु पुरस्सरपणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा गंभीर विषय असून यांची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून शिवसेना पक्षातर्फे पोलिस प्रशासनाचा त्रीव्र जाहिर निषेध करित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदर निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, शहर उप प्रमुख जितेंद्र लोहार, विजय चौधरी, भूषण जैन, राजेन्द्र टाक व शिवसैनीकांच्या सह्या आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवार पासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Next Post

अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यात दि. २२ जानेवारी रोजी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता, शेतकर्‍यांनी जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्याचे कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

Next Post

अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यात दि. २२ जानेवारी रोजी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता, शेतकर्‍यांनी जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्याचे कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add