तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील पालिकेने आपल्या निधीतून पाच टक्के निधी शहरातील १९५ दिव्यांगाना त्यांचा बँक खात्यावर नुकताच वर्ग केला असून साधारण पावणे पाच लाख रुपये देण्यात आले आहे.पालिकेच्या या निर्णयाबाबत दिव्यांगानी समाधान व्यक्त केले आहे. तळोदा शहरातील नगर पालिका व ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीची आपल्या कार्य क्षेत्रातील दिव्यांगांसाठी एकूण निधीपैकी पाच टक्के निधी खर्च करण्याचा आदेश या संस्थांना दिला आहे.या बाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याची उदासीनता आता पर्यंत घेतली जात होती.अगदी दिव्यंगांच्या संघटने कडून संस्थंच्या प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्या प्रकरणी साफ दुर्लक्ष करण्यात येत होते.तथापि जिल्हा प्रशासनाने या विषयी ठोस कार्यवाही करून जिल्ह्यातील नगर पालिका प्रशासनास निधीची विचारणा केली होती.साहजिकच त्यांचा सुचनेला पालिका प्रशासनानी देखील तातडीने पुढील प्रक्रिया युध्दपातळीवर करून दिव्यांगांच्या हा प्रश्न मार्गी लावला आहे.तळोदा पालिकेनेही या बाबत ठोस कार्यवाही केली.त्यामुळे शहरातील १९५ दिव्यांगाणा दोन हजार ४०० रुपया प्रमाणे साधारण चार लाख ६८ हजाराचे अनुदान त्यांचा बँक खात्यात नुकतेच जमा केले आहे.साहजिकच दीव्यांगांच्या अनुदानाच्या प्रश्न मार्गी लागल्याने त्यांनी पालिका प्रशासना विषयी समाधान व्यक्त केले आहे.तथापि यासाठी आम्हास मोठ्या चकरा माराव्या लागल्या होत्या.कारण या दोन्ही यंत्रणांनी चीलंम तंबाखू च्या खेळ दिव्यांगांशी
खेळला होता.
ग्राम पंचायतीची उदासीनता.शहरातील नगर पालिकांनी दिव्यांगाच्या पाच टक्के निधी खर्चाच्या प्रश्न मार्गी लावला असला तरी ग्रामीण भागातील ग्राम पांचायतीनी या निधीबाबत अजूनही उदासीन भूमिका घेतली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग लाभापासून वंचित राहत आहेत. सदर निधी खर्चाबाबत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने देखील उदासीन धोरण घेतल्याने ग्राम पंचायतीचे फावत आहे.वास्तविक जिल्हा प्रशासनाने निधी बाबत कठोर भूमिका घेतली असताना जिल्हा परिषद प्रशासन का नरमाईच धोरण घेत आहे.असा सवाल दिव्यांगानी उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.एवढेच नव्हे तर दिव्यांगाची ग्रामीण भागातील खरी आकडे वारी समजण्यासाठी संघटनेने सर्वेची मागणी केली आहे.तीही अजून सुरू केली नसल्याचे दिव्यांग सांगतात.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदर यंत्रणेलाही निधीच्या खर्चा बाबत कडक निर्देश द्यावेत अशी मागणी आहे.
दिव्यांग मुलीस आर्थिक मदत
शहरातील दिव्यांग मुलगी मिनाक्षी माळी हिस सेवाभाविंच्या आर्थिक मदतीतून साडे सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात एका कार्यक्रमात देण्यात आली.यावेळी किर्तिभाई शहा,आर ओ मगरे, मंगलचद जैन,सुनील हिवरे, रशिलाबेन जैन, अम्मिबेन तुरखीया,वणीलाल कुंभार,रोनील शहा,सुरेश राणे,गणेश मराठे आदी उपस्थित होते.
तळोदा शहरातील दिव्यंगाना पालिकेच्या निधीतून रक्कम प्राप्त झाली आहे.परंतु ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीनिही त्यांचा कडील निधी बाबत ठोस कार्यवाही करावी.यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.
मंगलचद जैन,
तळोदा तालुका अध्यक्ष.प्रहार दिव्यांग संघटना.