नंदुरबार l प्रतिनिधी
अक्राणी तालुक्यातील कारभारीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत असेलेल्या मांडवी खु येथे जलसाक्षरता समितीतर्फे श्रमदानातून केली वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे.
अक्राणी तालुक्यातील कारभारी पाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांडवी खु येथे जलसाक्षरता समितीने नुकताच एक वनराई बंधारा बांधण्यात आला. बंधारा निर्मितीमुळे परिसरातील नागरिकांना व गुरांना पाण्याची उपलब्धता होईल. तसेच जवळच्या ५-६ कर शेतीला दुबार पीक घेता येईल असे जलसाक्षरता समितीचे पानसिंग राहसे यांनी सांगितले .बंधारा निर्मिती साठी पानसिंग राहसे यांची पत्नी व मुलं यांनी सहभाग नोंदवला. वनराई बंधार्यासाठी बायफचे समन्वयक लिलेश चव्हाण व जलसाक्षरता समितीचे प्रा.डाॅ.एच. एम.पाटील यांचे सहकार्य लाभले.










