नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे प्रशासनातर्फे रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात बुधवार रोजी रोजी तब्बल ३१२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.
नंदूरबार जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. जिल्ह्यात दि.१९ जानेवारी रोजी दिवसभरात ३१२ कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात नंदूरबार तालुक्यात ११७,शहादा १५४, अक्कलकुवा तालुक्यात ५ ,धडगाव तालुक्यात ३ नवापूर तालुक्यात ५४, तर बाहेर जिल्ह्यातील ७ जणांचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात १२९८ कोरोनाचे ॲक्टीव रुग्ण आहेत.नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.










