नंदुरबार l प्रतिनिधी
धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, अपक्ष 48 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.आज झालेल्या मतमोजणीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत शिवसेनेने भगवा फडकवला नगरपंचायतीच्या 17 जागांमध्ये शिवसेना 13 जागांवर विजयी तर काँग्रेस 3 तर भाजपा 1 जागेवर विजयी झाले.
धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी आज तहसील कार्यालयात मतमोजणी झाली यात धडगाव नगर पंचायत निवडणूकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने भगवा फडकवला असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड के सी पाडवी यांना मोठा धक्का मानला जातो आज झालेल्या मतमोजणीत उमेदवारांना मिळालेले मते प्रभाग क्रमांक 1 पावरा ललीता तुकाराम – भाजपा विजयी 65 मिळालेली मते ,पावरा बेबी निलेश – शिवसेना 42 मिळालेली मते ,पावरा कविता चेतन – काँग्रेस 13 मिळालेली मते, प्रभाग 2 पावरा ललीता संजय – काँग्रेस विजयी 226 मिळालेली मते, पावरा बिना अर्जुन – शिवसेना 208 मिळालेली मते, प्रभाग 3 पावरा कल्याणसिंग भरतसिंग – काँग्रेस विजयी 263 मिळालेली मते, खर्डे युवराज रोहिदास – शिवसेना 138 मिळालेली मते, ढोले जितेंद्र दिलीप – भाजपा 28 मिळालेली मते, प्रभाग 4 पराडके भरतसिंग पारशी – शिवसेना विजयी 253 मिळालेली मते, राहसे चेतन रायसिंग – काँग्रेस 21 मिळालेली मते, वसावे रमेश ईरम – भाजपा 78 मिळालेली मते, प्रभाग 5 पावरा रघुनाथ विरसिंग – शिवसेना विजयी 206 मिळालेली मते, चव्हाण नितीन भिमसिंग – काँग्रेस 83 मिळालेली मते, पावरा सुनिल लोटन – भाजपा 76 मिळालेली मते, पावरा सोनल सरदार – राष्ट्रवादी 17 मिळालेली मते, प्रभाग 6 पावरा राजेंद्र गुलाबसिंग – शिवसेना विजयी 175 मिळालेली मते, पावरा राॅकेश अनिल – काँग्रेस 173 मिळालेली मते, प्रभाग 7 सरदार पारशी पावरा – शिवसेना विजयी 184 मिळालेली मते, इंदास दोहाण्या पावरा – काँग्रेस 124 मिळालेली मते, प्रभाग 8 ब्राम्हणे विजय छगन – शिवसेना विजयी 146 मिळालेली मते, शिंदे सागर सखाराम – काँग्रेस 49 मिळालेली मते, शिंदे भरत सोमा – भाजपा 39 मिळालेली मते, प्रभाग 9 चव्हाण भावना मिनेश – शिवसेना विजयी 252 मिळालेली मते, नवेज कमलाबाई धनराज – काँग्रेस 115 मिळालेली मते, जगताप सुरेखा बाळु – भाजपा 21 मिळालेली मते, प्रभाग 10 पावरा कविता राॅकेश – शिवसेना विजयी 115 मिळालेली मते, खरे सुवार्ता रमेश – काँग्रेस 76 मिळालेली मते, पराडके शिलावती कीर्ता – भाजपा 16 मिळालेली मते, प्रभाग 11 पराडके दिपीका जामसिंग – शिवसेना विजयी 180 मिळालेली मते, पावरा कमलीबाई हारसिंग – काँग्रेस 117 मिळालेली मते, पराडके शिलावती कीर्ता – भाजपा 4 मिळालेली मते, प्रभाग 12, पावरा धनसिंग दादला – शिवसेना विजयी 188 मिळालेली मते, पावरा ईश्वर हारसिंग – काँग्रेस 128 मिळालेली मते, राजु नवलसिंग पावरा – अपक्ष 74 मिळालेली मते, प्रभाग 13 पावरा पुरुषोत्तम दिलवरसिंग – शिवसेना विजयी 144 मिळालेली मते, पावरा संदिप नारसिंग – काँग्रेस 92 मिळालेली मते प्रभाग 14 पावरा गिरजा अंबाजी – काँग्रेस विजयी 192 मिळालेली मते, पाटील गोडमबाई दिलीप – शिवसेना 181 मिळालेली मते, पावरा ममता चिमा – अपक्ष 181 मिळालेली मते, प्रभाग 15 पावरा सुनंदाबाई हेमंत – शिवसेना विजयी 310 मिळालेली मते , पावरा गुंडीबाई अजय – काँग्रेस 173 मिळालेली मते, पावरा वर्षा गुंड्या – भाजपा 44 मिळालेली मते,प्रभाग 16 वळवी विद्या शिवराम – शिवसेना विजयी 224 मिळालेली मते, पराडके सुरतीबाई खेमा – काँग्रेस 111 मिळालेली मते, पराडके दिपीका शिवाजी – भाजपा 38 मिळालेली मते, प्रभाग 17 पराडके शर्मिला जमसर – शिवसेना विजयी 208 मिळालेली मते, पराडके ममता होमा – काँग्रेस 49 मिळालेली मते,पराडके शकिला दामु – भाजपा 79 मिळालेली मते मिळाली.










