Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
July 17, 2021
in शैक्षणिक
0

नंदुरबार ! प्रतिनिधी

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नंदुरबार अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून २८ जुलै २०२१ पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना नंदुरबार येथे अर्ज मागविण्यात आले आहेत.
गंगापूर क्र.१, टाकलीपाडा, केसरपाडा, भवानीपाडा, चौपाळे क्र.५ येथील अंगणवाडी केंद्रातील  अंगणवाडी सेविका ५ रिक्त पदासाठी तसेच सुतारे, धुळवद, कोठडा, शिरवाडे, सुदरर्दे क्र.२, उमर्दे ब्रु.१, घुली, जांभीपाडा अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाच्या ८ रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील  महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय ३० जून २०२१ रोजी २१ वर्ष पूर्ण ते ३२ वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदारास २ अपत्याचे वर अपत्य नसावे. अंगणवाडी सेविकेसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण ते उच्चत्तम तर मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्ण ते उच्चत्तम अशी आहे.
अर्जदार विधवा असल्यास गट विकास अधिकारी अथवा तहसिलदार यांचा दाखला जोडावा. विधवा व अनाथ उमेदवारास अतिरिक्त १० गुण देण्यात येतील. सक्षम प्राधिकार्‍याने वितरीत केलेला जातीचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारास एससी व एसटी साठी १० गुण तर व्ही.जे.एन.टी,ओबीसी, एस.बी.सी साठी ५ अतिरिक्त गुण देण्यात येतील. बारावी नंतर अर्जदार पदवीधर, डिएड, बीएड केले असल्यास अतिरिक्त ५ गुण देण्यात येतील. अंगणवाडी सेविका व मदतनीस कामाचा दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असल्यास सक्षम अधिकार्‍याचा दाखला जोडावा. रिक्त पदांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यास बदलाबाबत वा भरतीप्रक्रिया स्थगित करण्याबाबतचे अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना राहील. शैक्षणिक पात्रतेसंबंधी व अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र साक्षांकित केलेले असावे.
विहीत नमुन्यातील अर्ज आणि इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, नंदुरबार येथे संपर्क साधावा असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे

 

 

 

बातमी शेअर करा
Previous Post

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कुलसाठी जागा करा-खा.डॉ.हिना गावीत

Next Post

वाळुच्या भरधाव डंपरची दुचाकीला धडक, दोन युवक ठार

Next Post

वाळुच्या भरधाव डंपरची दुचाकीला धडक, दोन युवक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group