तळोदा | प्रतिनिधी
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळात महाविकास आघाडीच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी पदभार स्वीकारला असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळात अशासकीय व्यक्तीच्या समावेश करण्याबाबत मान्यता देण्यात आली, त्यानुसार शासनाने सदस्याची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर करण्यात आली. यासह इतर अशासकीय सदस्यांमध्ये अमोल भारती, विजय सूर्यवंशी, भरत चौधरी, प्रल्हाद मराठे, राजेश पाटील, आकाश वळवी, महेंद्र कलाल, सुरेश इंद्रजित, धनराज मराठे यांचा प्रशासकीय मंडळांत समावेश आहे. आज या महाविकास आघाडीने नेमणूक केलेल्या प्रशासक मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन पदभार स्वीकारला आहे.
दरम्यान, तळोदा येथील कलाल समाज पंच मंडळाचे उपाध्यक्ष व कॉंग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणारे महेंद्र जगनसा कलाल यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात अशासकीय प्रशासक (संचालक) पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा माजी आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते देण्यात आले. महेंद्र कलाल यांच्या या निवडीबद्दल तळोदा कलाल समाज पंच मंडळाचे अध्यक्ष संजय कलाल, खजिनदार दिलीप गिरनार, सचिव मनीष कलाल, सदस्य विकास कलाल, जयवंत कलाल, शशिकांत कलाल, बबन बागुल, जगदीश कलाल, प्रकाश कलाल, मुकेश कलाल, विलास कलाल, विनायक कलाल, पंकज सरवारे, राजू कलाल, वासू कलाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.