नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भालेर केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेत ही सभा घेन्यात आली. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, कोवीड नियमांचे पालन करून इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करायला काहीही हरकत नाही. तर डॉ. राकेश पाटील यांनी शाळेत येतांना विद्यार्थ्यांनी काय सतर्कता पाळावी यासंदर्भात माहिती दिली.
याप्रसंगी गावातील मान्यवर दिनेश विक्रम पाटील, दगा आत्माराम पाटील, रघुनाथ चिंधा पाटील, त्र्यंबक पुंडलिक पाटील, डॉ. राकेश पाटील, मच्छिंद्र रतन पाटील, रामचंद्र धर्मा पाटील, आनंदा कैलास पाटील, सरुबाई चिंधा पाटील, गिरधर शांताराम शेवाळे, जयराम श्रावण पाटील, अशोक हरी पाटील उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. मन्सुरी यांनी प्रास्ताविक केले तर आभार डी. एन. सोलंकी यांनी मांडले. सभा यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक व्ही. जे. पाटील तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.