Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
July 13, 2021
in सामाजिक
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

नंदुरबार |  प्रतिनिधी

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी नगरपालिका, नगरपंचायत, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील  आणि प्रशासनाच्या मंडपांबाबतच्या धोरणाशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फुट व घरगुती गणपती २ फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेश मुर्ती ऐवजी घरातील धातू,संगमवर आदी मुर्तींचे पूजन करावे.
मुर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.  विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
ब्रेक दि चेन बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सर्व निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावी.

बातमी शेअर करा
Previous Post

कॉग्रेस पक्षाचे सेवादल माजी जिल्हाध्यक्षांचा कार्यकर्त्या सहित राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

पशुसंवर्धन विभागाच्या योजनासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

पशुसंवर्धन विभागाच्या योजनासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा

श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा

August 28, 2025
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप: नवीन कार्यपद्धती जाहीर : मधुरा सुर्यवंशी

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप: नवीन कार्यपद्धती जाहीर : मधुरा सुर्यवंशी

August 28, 2025
जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

August 28, 2025
शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देणार: शिक्षण विभाग,क्रीडा गणवेशबाबत ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे

शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देणार: शिक्षण विभाग,क्रीडा गणवेशबाबत ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे

August 28, 2025
रघुवंशी परिवाराचे शनिमांडळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश

रघुवंशी परिवाराचे शनिमांडळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश

August 28, 2025
अल्पसंख्यांक समाजा सोबत राष्ट्रवादी भक्कमपणे उभी : आमदार ईद्रीस नाईकवाडी

अल्पसंख्यांक समाजा सोबत राष्ट्रवादी भक्कमपणे उभी : आमदार ईद्रीस नाईकवाडी

August 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group