धडगाव l प्रतिनिधी
नर्मदा शुद्धीकरण व उपनद्या संवर्धन व पर्यावरण संवर्धन जन जागरण यात्रेपूर्वी स्वामी रमण गिरी महाराज यांनी धडगाव गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेत निसर्गाचे महत्व पटवून देत वृक्षारोपण केले. धडगाव येथील कै. एस. व्ही. ठकार माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात नर्मदा परिक्रमावासी उपेंद्रानंद बाबा यांच्या हस्ते अडूळसा ,पिंपळ ,कडुनिंब या बहु्गुणी वृक्षाचे रोपण करण्यात आले.


उपेंद्रानंद बाबा यांची मोटारसायकलद्वारे आपल्या सहकार्यांसोबत सलग बारावी नर्मदा परिक्रमा आहे. परिक्रमेदरम्यान वाटेतील प्रत्येक गावात थांबून वृक्षारोपण व जनजागृती करत परिक्रमा यात्रा सुरु आहे. धडगाव येथे त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, आपले पूर्वज निसर्गाचे उपासक होते. यासाठी आपण देखील पर्यावरणाशी छेडछाड करून, विकासाच्या नावाखाली निसर्गाचे उल्लंघन करणे योग्य नाही. यामुळे होणारे परिणामही आपण पाहिले आहे, निसर्गाला निसर्गाच्या स्थितीवर सोडून सर्व प्रकारचे संकटे टाळता येऊ शकतात.
यावेळी उपेंद्रानंद बाबा जी म्हणाले की पर्यावरण म्हणजे जल, जंगल, जमीन, प्राणी आणि माणसे मिळून निसर्ग निर्माण होतो आणि सध्या भौतिकतेच्या आंधळ्या शर्यतीत पर्यावरण शोषणाचा अतिरेक होत आहे, ज्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे.
या यात्रेत तीन जिल्ह्यांतील भक्त मंडळाचे कार्यकर्ते दररोज त्रिवेणी म्हणजेच अडूळसा ,पिंपळ ,कडुनिंबाची वृक्षारोपण करून प्रवासाला निघाले आहेत. या कार्यासाठी सोमनाथ महाराज यांनी संकल्प दिला. या उपक्रमाचे संचालन करण्यासाठी सतिलाल पाटील,जयराम चौधरी,विजय परदेशी, नितिन शिरसाठ, प्रविण साऴुंखे,अविनाश पाटील यांचे सहकार्य लाभले.









