Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात पावसा अभावी सहा लघुप्रकल्पांनी गाठला तळ

team by team
July 10, 2021
in कृषी
0
नंदुरबार जिल्ह्यात पावसा अभावी सहा लघुप्रकल्पांनी गाठला तळ

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात जुलै महिन्याचे ९ दिवस ओलटुनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्हयात विरचक धरणात ४३ टक्के पाणीसाठा आहे. तर शहादा तालुक्यातील दरा मध्यम प्रकल्पात ५७ टक्के, नवापूर-नागन प्रकल्प ४३ टक्के, नवापूर कोरडी प्रकल्पात २३ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. तर जवळपास ६ धरणे कोरडे पडले आहेत.
जुलै महिन्याचे ९ दिवस ओलटुनही जिल्ह्यात समाधान कारक पावसाची प्रतीक्षा असे असले तरी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणार्‍या शिवण मध्यम प्रकल्पात अर्थात विरचक धरणात ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहराला पिण्याची पाण्याची टंचाई भासणार नाही. मात्र अन्य धरणाची स्थिती चिंताजनक आहे. धरणात कमी पाणी साठा शिल्लक असल्याने सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. तर दरा, नागन प्रकल्प वगळता ६ छोटया धरणांनी तळ गाठला आहे.
जून महिन्यात दोन तीन वेळा पावसाने तुरळक अशी हजेरी लावली. त्यामुळे जिल्हयातील धरणांची स्थिती चिंताजनक आहे. दोन दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्हयात विरचक धरणात ४३ टक्के पाणीसाठा आहे. तर शहादा तालुक्यातील दरा मध्यम प्रकल्पात ५७ टक्के, नवापूर-नागन प्रकल्प ४३ टक्के, नवापूर कोरडी प्रकल्पात २३ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. ढोंग ता.नवापूर येथील छोटे धरण, चिरडा (ता.शहादा), धनपूर (ता.तळोदा) शुन्य टक्के पाणी आहे. तीच परिस्थिती नंदुरबारच्या घोटाणे, शहादा तालुक्यातील सुसरी, बलदाणे येथील अमरावतीची स्थिती आहे. नवापूरच्या नेसूमध्ये केवळ २८ टक्के तर भूरीवेल लघुपाट योजनेत केवळ २० टक्केच पाणी आहे. जवळपास ६ धरणे कोरडे पडले आहेत. तर सुसरी, दरा व विरचक या ३ मध्यम प्रकल्पात समाधानकारक साठा आहे. दरम्यान, यंदा ३८.६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भात व कापूस लागवड ४३ टक्क्यांवर पोहचली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात केवळ ६८.५० मिमी पाऊस झाला आहे. जून मध्ये सरासरी ४४ टक्केच पाऊस झाला आहे. शेतकर्‍यात चिंता व्यक्त होत आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी तुरळक पाऊस पडला. दिवसभर उकळत होते. शहरातील निम्म्या भागात तुरळक पाऊस तर निम्म्या भागात पाऊस पडला नाही.

बातमी शेअर करा
Previous Post

डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन करणार-दादाजी भुसे

Next Post

गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा गोरक्षकांचा इशारा

Next Post
गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा गोरक्षकांचा इशारा

गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा गोरक्षकांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add