Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्ताचे दर्शन

team by team
December 19, 2021
in राज्य
0
सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्ताचे दर्शन

सारंगखेडा l प्रतिनिधी
‘ सर्वज्ञ श्री दत्तात्रेय भगवान की जय ‘ च्या घोषणेने आज पहिल्या दिवशी दत्त प्रभूंच्या दर्शनाला पहाटेपासूनच स्थानिक व परप्रांतीय भक्तांची रांग लागली . होती .पहाटे तीनला घंटानादात दत्त प्रभूंच्या मूर्तीला विधीवत स्थान करण्यात आले . त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले . यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात येत होते .
मार्गर्षिश पौर्णिमेच्या दत्त अवतार दिनानिमित्त दत्त प्रभुंना आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत नयनांनी साठविलेले अभिषेकांनंतरचे दत्तांचे सजविलेले आकर्षण रुप, फुलांची पुष्पवृष्टी आणि दत्त प्रभु की जय चा जयघोषाने अवघी सारंगखेडा दत्त नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली . दत्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या भक्तीने दत्त सोहळा आज सजला होता . सायंकाळ पर्यंत भाविकांची गर्दी वाढली .
कोरोनाच्या साथीमुळे प्रशासनाने यात्रा भरविण्यास मनाई आदेश जारी केले होते . कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली यात्रा परिसर व अश्व बाजारातील प्रमुख रस्त्यावर पोलीसांचे संचलन करण्यात आले होते . यात्रा व मुख्य रस्त्यावर बॅरीगेट लावण्यात आले आहेत .ओमिक्रॉन ची परिस्थिती घेऊन लस घेतलेल्या व मास्क लावलेल्या भाविकांना दर्शना साठी सोडण्यात येत होते .
दीडशे तुलांचे नवस 
नवसाला पावणाऱ्या दत्त प्रभुंचा नवस फेडण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी होती . दुपारी दोन पर्यंत दीडशेहून अधिक तुलाचे नवस फेडले होते . मुला . मुलींचे लग्न व्हावे , घर बांधणे , कोरोना मुक्त झालेले , अपघातातून जीव वाचणे , आजारपणातुन बरे होणे , मुल होणे , निवडणुकीत विजयी होणे आदींचे नवस फेडण्यासाठी साखर , गुळ , केळी , पेढे , चिल्लर आदींची तुला करून नवस फेडले जात होते .

बातमी शेअर करा
Previous Post

पोषक तृणधान्याचे आहारामध्ये महत्वाची भूमिका : ॲड. सीमा वळवी

Next Post

धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे मयत सभासदास साडे पाच लाखांची कर्जमाफी देत दिला मदतीचा धनादेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add