Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोषक तृणधान्याचे आहारामध्ये महत्वाची भूमिका : ॲड. सीमा वळवी

team by team
December 18, 2021
in कृषी
0
पोषक तृणधान्याचे आहारामध्ये महत्वाची भूमिका : ॲड. सीमा वळवी

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषक तृणधान्यांचा आहारा मध्ये वापर करणे गरजेचा आहे. आपल्या जिल्हात तृणधान्याचे पीक पूर्वी पासून घेत आहोत परंतु त्याचा आहारामध्ये जसा पाहिजे तसा वापर होत नाही, पोषक तृणधान्यामध्ये खूप पोषक घटक आहे जे कुपोषण कमी करण्यासाठी मदत होईल तसेच महिलांनी त्याचा आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी केले.कृषि विज्ञान केंद्रात सुरु असलेल्या १५ व्या कृषि तंत्रज्ञान महोत्सवात पोषक तृणधान्य पीकपरिसंवाद आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पोषक तृणधान्य पीक परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदासभाई पाटील, विश्वस्त केदारनाथ कवडीवाले, डॉ. यु . डी. चव्हाण,जिल्हा उद्योग अधिकारी दिलीप पाटील, मिलिंद पाटील ,प्रा.अम्रिता राऊत, डॉ.प्रिया सांगोले, राजेश वसावे, आर. एस. दहातोंडे, मंजुषा परदेशी , रीताताई पडवी, आशाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तांत्रिक सत्रात डॉ. यु.डी चव्हाण यांनी ज्वारी चे आहारातील महत्व आहारामध्ये ज्वारीचे उपयोग का करवा,तसच ज्वारी एक तृणधान्य मधील महत्वाचे पीक आहे ज्वारीमधून विविध प्रकारचे जीवनसत्व आपल्याला मिळतात .ज्वारीचे भाकरी आपण खतो परंतु ज्वारी पासून २० पदार्थ बनविता येतात ते त्यांनी सांगितले ज्वारी चे प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या मशनरीची आवश्यकता आहे हे सांगितले.
डॉ.प्रिया सांगोले यांनी तृणधान्य म्हणजे कोणती धान्य येतात व त्याचे पोषक घटक कोणती आहे हे सोप्यान पध्दतीने मांडणी केली आणि भगर, बाजरी,नागली यामधून कोणती पोषक घातक मिळतात हे सविस्तर सांगितले.
प्रा.अम्रिता राऊत यांनी उपस्थित शेतकरी महिलाना बाजरीचे आहारामधील महत्व किती आहे. व धनशक्ती बाजरी बिस्किटाचे प्रत्यक्षिक करून दाखविले.व नागलीचे महत्व सांगत नागली बिस्किटाची प्रक्रिया सांगितली बनविलेले प्रोडक्ट कशी पद्धतीने पॅकजिग आणि जाहिरात कशी करावी याची माहिती दिली. कृष्णदासभाई पाटील यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात शेतकरी महिलांनी शेतात जास्तीत जास्त तृणधान्य लागवड करावी व आपल्या आहारा मध्ये त्याचा समावेश करवा असे सांगितले .
कार्यक्रमाची प्रास्ताविक राजेंद्र दहातोंडे यांनी बदलत्या वातावरणात तृणधान्य पिकाची जास्त प्रमणात लागवड करून त्यचे विविध प्रक्रिया पदार्थ करावे व प्रक्रिया उद्योगावर जास्त भर द्यावा असे या परिषदेत उपस्थित महिलांना आवाहन केले. तृणधान्य चा वापर आहारामध्ये करणे खूप महत्त्वाचा आहे आणि धनशक्ती बाजरी या मध्ये लोहाचे प्रमाण ९८ टक्के आहे व हे बाजरी महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे.जर या बाजरीचा वापर जास्तत जास्त झाल केला तर महिलांमध्ये कमी लोहाचे कमतरतेचे प्रमाण कमी होईल असे विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान आरती देशमुख यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आरती देशमुख व आभार प्रदर्शन विषय तज्ञ यु. डी. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीकतेसाठी, पी.सी कुंदे, जयंत उत्तरवार , सचिन फड, आर. आर. भावसार, विजय बागल, गिता कदम, किरण मराठे, कैलास सोनवने, कल्याण पाटील, अरुण कदम, कमलकिशोर देशमुख, जितेंद्र माळी, राहुल नवले, रजेसिंग राजपूत आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

Next Post

सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्ताचे दर्शन

Next Post
सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्ताचे दर्शन

सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्ताचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add