Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा येथील एकमुखी दत्त प्रभुची जन्मोत्सव निमित्त यात्रोत्सवाची तयारी पूर्ण, आज पालखी मिरवणूक सोहळा

team by team
December 18, 2021
in राज्य
0
सारंगखेडा येथील एकमुखी दत्त प्रभुची जन्मोत्सव निमित्त यात्रोत्सवाची तयारी पूर्ण, आज पालखी मिरवणूक सोहळा

सारंगखेडा l प्रतिनिधी
सारंगखेडा येथील महानुभाव संप्रदायाचे एकमुखी दत्त प्रभुची जन्मोत्सव निमित्त ( ता. १८ ) शनिवारी रात्री पालखी सोहळा मिरवणूकीचा कार्यक्रम होणार आहे . भाविकांना दर्शनासाठी जय्यत तयारी सुरू असून . मंदिरात रोषणाई करण्यात येत आहे .
सारंगखेडा येथील एकमुखी दत्त मंदिरात श्री . दत्त जयंती सोहळ्यानिमित्त पारायणासोबत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत . शनिवारी दत्त जयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून , मंदिराच्या आवारात आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात येत आहे .पहाटे ४ वाजता विधीवत श्रीमृर्ती मंगळस्थान पूजाविधी ,अवसर होईल त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शना साठी खुले करण्यात येईल . सायंकाळी ७ वाजता पंचावतार उपहार विधी करण्यात येईल , दिवे प्रज्वलीत करुन आरती सोहळाचा कार्यक्रम होईल . दत्त प्रभुचा मुर्ती ची पूजन पातुरकर बाबा महानुभाव , दिवाकरमुनी बाबा महानुभाव ,चेतक फेस्टीव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल ,. जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या रावल , उपविभागीय अधिकारी डॉ . चेतन गिरासे , तहसीलदार डॉ . मिलिंद कुळकर्णी , सरपंच पृथ्वीराजसिंह रावल , दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष अंबालाल पाटील यांचा हस्ते करण्यात येईल . रात्री ८ वाजता पालखी मिरवणूकीत मंदिर ग्राम प्रदक्षिणा करण्यात येईल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भाविकांनाच दत्त दर्शन घेता येईल . सॅनिटायझर तसेच धर्मल स्क्रिनिंग करूनच दर्शन रांगेत सोडण्यात येणार आहे . त्यासाठी तात्पूरत्या स्वरूपातील मंडप उभारण्यात येणार आहे . मास्क , फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे भाविकांना वेळोवेळी आवाहन करण्यात येणार आहे . या काळात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे . अशी माहीती दत्त मंदिर संस्थान सचिव भिक्कन पाटील यांनी दिली .

बातमी शेअर करा
Previous Post

मृत व्यक्तीच्या नावे आधारकार्ड बनवून जमिनीची खरेदी विक्री केल्याप्रकरणी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

अल्पवयीन मुलीस पळविले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Next Post

अल्पवयीन मुलीस पळविले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add