Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मृत व्यक्तीच्या नावे आधारकार्ड बनवून जमिनीची खरेदी विक्री केल्याप्रकरणी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
December 17, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
मरण पावलेल्या व्यक्तीच्या छायाचित्राचा दुरूपयोग करीत तो व्यक्ती आपण असल्याचे भासवून बनावट आधारकार्ड काढून नंदुरबार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्राचा आधार घेत जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा चेतन अहिरे (रा.भागापूर, ब्राम्हणपुरी ता.शहादा) शिक्षीत तरूणीचे आजोबा पुंजाराम राघो अटक यांचा २००८ साली मृत्यू झाला होता. तत्पुर्वी त्यांनी नंदुरबार शहरात जमिन घेतली होती. ती जमिन विक्री  झाल्याचे अलीकडेच मनिषा अटक (अहिरे) यांना कळले. त्यांनी दिलेल्या नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद म्हटले आहे की, त्यांचे आजोबा पुंजाराम राघो अटक हे मयत आहेत. असे असतांना आजोबांचे बनावट आधारकार्ड बनवून संगनमत करून फकिरा मोतीराम जाधव यांनी स्वतःला आजोबांचा जागी उभे करून पुंजाराम अटक नाव धारण केले व पुंजाराम असल्याचे भासविले. त्यानंतर नंदुरबार शहरातील बिनशेती सर्व्हे क्र. २०३/ २/२, २०४/ २, २०४/ २/२ (संगणकीय क्रमांक ६६२) हेमंत नगरमधील प्लॉट क्र. ३० चे क्षेत्रफळ २०८ चौरस ही मिळकत दि.२ जून २०२० रोजी व दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी बेकायदेशीर खरेदी विक्री करून फसवणूक केली. म्हणून मनिषा अटक (अहिरे) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फकिरा मोतीराम जाधव रा.भोणे (ता.जि.नंदुरबार), अनिषा प्रदीप भावसार, संगिता सुनिल भावसार दोन्ही रा.दोंडाईचा (ता.शिंदखेडा जि.धुळे), जगदिश भिक्कन चित्रकथे रा.खापर (ता.अक्कलकुवा), भरत बन्सीलाल रघुवंशी, मुकेश शिंत्रे दोन्ही रा.नंदुरबार याचा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकेश पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पहिल्या टप्प्याअंतर्गत वाण्याविहीर येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी सर्वेक्षणाला सुरवात

Next Post

सारंगखेडा येथील एकमुखी दत्त प्रभुची जन्मोत्सव निमित्त यात्रोत्सवाची तयारी पूर्ण, आज पालखी मिरवणूक सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add