सारंगखेडा l प्रतिनिधी
गेल्या वर्षी कोरोनामुळे बंद असलेला सारंगखेड्यातील अश्व बाजाराची खरेदी विक्रीचा व्यवहार सुरु झाला असून काल पाच लाखाची १० अश्वांची विक्री झाली असून अश्व बाजाराची बोहनी झाल्याने यंदा अश्व बाजारात कोटयावधी रुपयांची उलाढाल होईल अशी शक्यता आहे .
जातीवंत घोडयांचा बाजार अशी ओळख असलेल्या या यात्रेतील घोडेबाजारात देशभरातील अश्वप्रेमी दाखल होत असून घोडे बाजारात दरवर्षी पाच कोटीहून अधिक उलाढाल सुरू असते . घोडे खरेदी .विक्रीच्या व्यवहारासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपकेंद्र उभारण्यात आले आहे . आता पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यांतुन अश्व विक्रेते दाखल होत आहे . काठेवाड , सिंधी , मारवाड , पंजाब या जातीचे अश्व येथे दाखल झाले आहे .
अश्व खरेदी .विक्रीसाठी ग्राहकांची लगबग सुरु झाली आहे . काल कर्नाटकातील आसिफ सत्ताक यांनी एक लाख पाच हजार रुपयांची व ५० हजार रुपयांची पंजाब जातीची घोडी खरेदी केली . दिवसभरात १० घोडयांची विक्रीतुन पाच लाखांची उलाढाल झाली . यावेळी चेतक फेस्टीव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल उपस्थित होते.










