नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील श्रीरामपुर व सुतारे
ग्रामपंचायत प्रभाग रचनेचे दिलेले कामकाज करण्यास टाळाटाळ करीत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या अभियंत्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुका पंचायत समिती येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता ई . जी . भामरे यांना दि . ६ डिसेंबर ते दि . १३ डिसेंबर दरम्यान श्रीरामपुर व सुतारे गावाचे ग्रामपंचायत प्रभाग रचनेचे कामकाज सोपविण्यात आले होते . शाखा अभियंता भामरे हे शासकिय कर्मचारी असून त्यांना श्रीरामपुर व सुतारे गावाचे ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना दिलेले कामकाज करण्याचे सकारात्मक प्रतिसाद दिला नाही व काम करण्यास टाळाटाळ करुन महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग यांच्या आदेशाचे व जिल्हाधिकारी तसेच तहसिलदार यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणूनया नायब तहसीलदार भीमराव बोरसे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात पंचायत समितीचे अभियंता ई . जी . भामरे यांच्या विरूद्ध लोक प्रतिनिधी अधि . १९५० प्रमाणे कलम १३४ ( १ ) निवडणुक ४८१/२०२१ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोसई सोनवणे करीत आहेत. करीत आहेत .