तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सदर वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे युवती सभेच्या अध्यक्ष प्रा. डॉ.सुनिता गायकवाड यांनी युवती सभेअंतर्गत विविध उपक्रम राबविले त्यापैकी कलर्स डे, ट्रॅडिशनल डे ,साडी डे ,व सात दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली .
व्याख्यानमालेत प्राध्यापकांनी विविध विषयांवर व्याख्याने दिले. यामध्ये प्रा. जे. एन. शिंदे ,प्रा. डॉ.पी .आर .बोबडे, प्रा.डॉ.एस. बी. गरुड, प्रा. डॉ. पराग तट्टे, प्रा. सोनवणे ,प्रा. डॉ. जी.एम. मोरे , प्रा.एम.एस.जावरे यांनी विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच बरोबर आदिवासी साहित्य संमेलन युवती सभेच्या अंतर्गत भरवण्यात आले .तसेच हर्बेरियम एक्झिबिशन भरवण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला 50 वेगवेगळ्या हर्बरियम कलेक्शन केले होते .या सर्व कार्यक्रमाला सहाय्यक म्हणून डॉ. तट्टे, प्रा.सोनवणे यांनी सहकार्य केले तसेच या एक्झिबिशन ला सर्व प्राध्यापक वर्ग यांनी भेट दिली. विविध फॅकल्टी च्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. नॉन टिचींग स्टाफ ही उपस्थित होता .यावेळी प्राचार्य डॉ. एस. आर. मगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.