Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रगत अध्यापनशास्त्राच्या मदतीने मूल घडवा : डॉ जगराम भटकर

team by team
December 16, 2021
in Uncategorized
0
प्रगत अध्यापनशास्त्राच्या मदतीने मूल घडवा : डॉ जगराम भटकर

नंदुरबार l प्रतिनिधी
प्रगत अध्यापन शास्त्र याविषयी प्राप्त झालेल्या ज्ञानातून आपल्या मुलांना घडविण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मुले घडवावित, असे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी केले. प्रगत अध्यापन शास्त्र विषयी आयोजित कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रशस्तीपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार, क्वेस्ट संस्था पालघर, ज्ञानप्रकाश फाउंडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील निवडक शिक्षकांसाठी भाषा व गणित प्रगत अध्यापन शास्त्र प्रशिक्षण घेण्यात आले. हा लघु मुदतीचा कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रशस्तीपत्र वाटप कार्यक्रम शहरातील एस ए मिशन हायस्कुल जिमखाना येथे आयोजित करण्यात आला होता.
जिल्ह्यातील भाषा व गणित विषयाच्या प्रत्येकी 30 शिक्षकांची या लघु मुदतीच्या कोर्ससाठी निवड करण्यात आली होती. संपर्क सत्र, सराव सत्र, प्रत्यक्ष वर्गकार्य व प्रत्याभरण असे या कोर्सचे स्वरूप होते. पालघर जिल्ह्यातील सोनाळे ता. वाडा येथे मुख्यालय असलेल्या क्वेस्ट संस्थेचे संचालक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ निलेश निमकर यांच्यासह
संस्थेच्या तज्ञांनी या प्रशिक्षणासाठीची शैक्षणिक मदत दिली.
ग्यानप्रकाश फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे राज्यतज्ञ मधुकर माने व श्रीमती पल्लवी मुखेडकर तसेच जिल्हा समन्वयक श्रीमती सोनल शिंदे यांच्या मदतीने कोविड काळात शिक्षकांसाठी भाषा व गणित अध्यापन शास्त्राचे प्रशिक्षण हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. बदलत्या काळासोबत शिक्षकांनाही बदलत्या व प्रभावी अध्यापन पद्धतींची माहिती या प्रशिक्षणातून झाली. दिड वर्ष कालावधीत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने हा कोर्स पूर्ण करण्यात आला.
कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांना समारंभपूर्वक प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले.
यानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलतांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी प्रशिक्षित शिक्षकांचे अभिनंदन करतांनाच शिक्षकांनी नवनवीन अध्यापन पद्धतींचा वापर करून प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. खाजगी स्तरावर क्वेस्ट ही संस्था राज्यातील शिक्षकांना विशिष्ठ मोबदला घेऊन उपलब्ध करून देत असलेला हा कोर्स नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांसाठी मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनीही शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षण विभागाकडून शिक्षक समृद्धीसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देतानाच प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान इतर शिक्षकांपर्यंत पोहचवून त्यांनाही अधिक समृद्ध करा, असे आवाहन त्यांनी केले.
शून्य आणि वर्तुळ हे सारखे दिसत असले तरी
त्यात मोठा फरक असतो. शून्यात मनुष्य एकटा असतो तर वर्तुळात आपली माणसं असतात, याची जाणीव ठेऊन शिक्षकांनी वर्तुळातील सर्वांनाच सोबत घेऊन प्रगती साधावी, असे आवाहन करतांनाच एकाच प्रकारचे अध्ययन अनुभव देण्यापेक्षा विविध प्रकारचे अनुभव देणे अधिक परिणामकारक ठरेल, असे मत जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात दोन शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी शिक्षिका श्रीमती रोहिणी बाविस्कर यांनी सांगितले की, कोर्सच्या माध्यमातून आजवर विचारात न घेतलेल्या बारकाव्यांवर देखील चर्चा घडली. अनेक बाबींचा यातुन उलगडा झाला. नवनवीन क्लुप्त्या माहीत झाल्या, ज्या विद्यार्थ्यांना अध्यापन करताना अतिशय उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षणार्थी शिक्षक दीपक वसावे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नियोजनाची प्रशंसा करत, नंदुरबार जिल्ह्यातील बालकांसाठी यामुळे खुप मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर नंदुरबारच्या मिशन हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या एलिना बिजू पराईल व रिया राजेश वासवानी या विद्यार्थीनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण, अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, सुभाष वसावे, एस. ए. मिशन हायस्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, ज्युनिअर कॉलेजचे इंचार्ज सी. पी. बोरसे, ग्यानप्रकाश फाउंडेशन च्या जिल्हा समन्वयक श्रीमती सोनल शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी प्रास्ताविक करतांना या प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती देऊन, नंदुरबार जिल्ह्यातील या प्रशिक्षित शिक्षकांचा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचा हातभार लागणार असल्याचे सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील भाषा व गणित विषयाच्या या प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन व नियोजन केल्याबद्दल विषय सहायक उदय केदार यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय सहायक श्री देवेंद्र बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुरबार गटसाधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती आर. आर. पाटील व ज्ञानेश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार तहसील कार्यालयात राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ४९ लाभार्थ्यांना 9 लाख 80 हजाराची मदत, दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश व शिधापत्रिकांचे वाटप

Next Post

तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवती सभेतर्फे राबविण्यात आले विविध उपक्रम

Next Post
तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवती सभेतर्फे राबविण्यात आले विविध उपक्रम

तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवती सभेतर्फे राबविण्यात आले विविध उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add