विसरवाडी l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील भरडू येथील अनुदानित आश्रमशाळेत सिकलसेल आजार नियंत्रण जनजागृती सप्ताहाच्या निमित्त सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात आली.
डिसेंबर महिन्यात दि.११ ते १७ डिसेंबर सिकलसेल सप्ताहाअंतर्गत जनजागृती व तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याअनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा वळवी यांच्या मार्गदर्शनात जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा सिकलसेल समन्वयक उमेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सिकलसेल आजार कसा होतो व सिकलसेल आजार कसा ओळखावा या आजारा बाबत मार्गदर्शन केले. तसेच तालुका सिकलसेल सहाय्यक राहुल सोनवणे यांनी लग्नापूर्वी मुलगा मुलगी दोघांनी सिकलसेल ची तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी गाताडी प्राथमिक आरोग्य केंद्र
वैद्यकीय अधिकारी डॉ.शितलकुमार पाडवी, डॉ. संगीता जाधव, जिल्हा सिकलसेल समन्वयक उमेश शिंदे, तालुका सिकलसेल समन्वयक राहुल सोनवणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी पराग जगदेव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हरीश गावीत आरोग्य पर्यवेक्षक पी.के.गावित, परिचारिका शर्मिला गावित, आशा सेविका सुनिता वळवी व शितल गावित यांनी तपासणी केली.
यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक नरेश मोरे, अधीक्षक डी.डी.मावची, महेंद्र कापसे, विजय भदाणे, धर्मेश गावित, विनोद गावित, दिपक वाडिले, शरद मोरे, वसंत गावित, जितेंद्र कुवर, कनकसिंग सिसोदे, प्रशांत राजपूत, रितेश गावित, सुरेखा गावित वाशी वसावे,पुनम धनगर, नुरजहा शाहीद आदी उपस्थित होते.










