नंदुरबार l प्रतिनिधी
सध्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांवर विविध प्रकारचे आजार दिसून येत आहेत. यामुळे रिलायन्स फाउंडेशन व पशुसंवर्धन विभाग शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा तालुक्यातील पाडळदा येथे मोफत जनावरांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले,
हिवाळा सुरू झाल्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरांना वेळेवर लसी देणे गरजेचे असते. या शिबिरामध्ये पशुपालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या जनावरांना तपासणी करून उपचार व लसीकरण करण्यात आले. ज्यामध्ये गाय, म्हैस, शेळी, बैल यांना तपासणी करून लसीकरण व मोफत औषधोपचार करण्यात आले . या शिबिराला शहादा येथून पशुवैद्यकीयअधिकारी डॉ. सागर परदेशी आणि डॉ. गो. स्वामी, डॉ. हिम्मतसिंग पावरा , डॉ. सचिन पाटील , डॉ. लखन पावरा, डॉ. रामचंद्र भंडारी यांनी संपुर्ण लसीकरण करुन पशुपालकांना मोलाचे मार्गदर्शन केले . मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या मार्गदर्शनात हिवाळ्यात जनावरांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी? गोठा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन इत्यादी अशा अनेक विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सोबतच दुधाळ जनावरांची निगा कशी राखावी याबद्दल माहिती सांगण्यात आली.
या कार्यक्रम कार्यक्रम यशस्वीतेसाठी ‘पाडळदा येथील ‘विजयभाई पाटील, राजेंद्र कुवर, हितेश चौधरी आणि सुरेशभाई पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक कालुसिंग पटले उपस्थीत होते. यावेळी कालुसिंग पटले यांनी रिलायन्स फाऊंडेशनची टोल फ्री नंबर 1800 419 8800 विषयी माहिती दिली. शेती विषयक जनावरांचे आरोग्याविषयी शेतकऱ्यांनी माहिती विचारावी असे आवाहन केले व शिबिराचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे व्यवस्थापक शुभम लाखकर आयोजन यांनी केले . या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी आपल्या जनावरांचे उपचार व लसीकरण करून घेतले.










