सारंगखेडा l प्रतिनिधी
एकमुखी दत्ताच्या यात्रा व अश्वबाजाराला चार दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने अश्व बाजाराचा उपक्रमांची तयारी सुरू आहे . पोलीस अधिक्षक पी .आर. पाटील यांनी अश्व बाजारात पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या .


एकमुखी दत्त यात्रेला १८ डिसेंबर पासून सुरूवात होत आहे . यात्रोत्सव व अश्व बाजाराला अवगे चार दिवस शिल्लक असून मंगळवारी जिल्हा पोलीस अधिक्षक पी .आर. पाटील यांनी अश्व बाजाराला भेट देऊन पाहणी केली .कोरोनाचे नियमांचे पालन करुन आगळा वेगळा अश्व बाजार भरत आहे . आता पर्यत अश्व बाजारात ५०० च्यावर अश्व दाखल झाले आहेत . चार दिवस अश्व स्पर्धा होणार असल्याने अश्वप्रेमींना स्पर्धांची मेजवाणी मिळणार . अश्व बाजारात ( ता. 31 ) पर्यंत अश्वप्रेमी , भाविक येणार असल्याने वाहने पार्कीगच्या जागा , रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा सूचना पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ यांना दिली . अश्व बाजारात वीज , पाणी बाबत चर्चा केली . कायदा सुव्यवस्थे बाबत विशेष लक्ष देण्याचा सूचना करून संबंधित विभागांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या . यावेळी चेतक फेस्टीव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल , स्थानिक गुन्हा अन्वेषक शाखेचे पोलीस अधिक्षक रविंद्र कळमकर ,पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी आदी उपस्थित होते .









