सारंगखेडा l प्रतिनिधी
जातीवंत घोड्यांचा बाजारासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील एकमुखी श्री . दत्त प्रभुच्या यात्रेला १८ डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे . दोन दिवसांत पाचशेच्या वर अश्वांचे आगमन झाले आहे . घोडयांचा टापांनी परिसर गजबजत आहे . गेल्या वर्षी कोरोनामुळे अश्व बाजार रद्द करण्यात आला होता . यंदा अश्व बाजाराला शासनाने परवानगी दिल्याने अश्व बाजार बहरण्यास प्रारंभ झाला आहे . त्यांचा साठी टेंभा रस्त्यावरील चेतक टेंट सिंटी समोर च्या १५ एकर क्षेत्रातील प्रांगणात मंडपाची उभारणी करण्यात आली आहे .
येथे श्री . दत्त प्रभु यात्रेचे प्रमुख आकर्षण व देशातील अश्व बाजाराच्या सर्वाधिक खरेदी _ विक्रीसाठी प्रसिद्ध आहे . या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यांतुन अश्व विक्रेते येतात . यात्रा काळात दोन हजार पेक्षा जास्त अश्व येत असतात . विविध जातीवंत घोडे येथे येतात . त्यांच्या राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येते . घोडे निरिक्षकांसाठी बॅरिकेट्स , पुरेशी वीज , पाणी , आरोग्य सुविधा , चारा आदी व्यवस्था केली जात आहे . धुळ उडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे . घोडयांचा रायडिंग साठी विशेष जागा उपलब्ध करण्यात आली आहे .कोरोना नियमांचे काटेकोर पालन याठिकाणी करण्यात येणार आहे . अश्व शौंकिंनाना अश्व पाहण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र दाखविल्या शिवाय प्रवेश दिले जाणार नाही . या साठी प्रवेश द्वार जवळ आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जाणार आहे .


यात्रेत पाचशे अश्व दाखल
येथील अश्व बाजारात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश , गुजरात , राजस्थान राज्यातील दोनशेहून अधिक उमदे अश्व दाखल झाले आहेत . दोन तीन दिवसात मोठया प्रमाणात अश्वांची रेलचेल होईल . अश्व दाखल होऊ लागल्याने स्थानिकांना चारा विक्री चा रोजगार उपलब्ध झाला आहे .









